तेऊरवाडी गावची बिमाग्रामची हॅट्रीक, तिसऱ्यांदा पटकाविला बिमाग्राम पुरस्कार - चंदगड लाईव्ह न्युज

18 March 2020

तेऊरवाडी गावची बिमाग्रामची हॅट्रीक, तिसऱ्यांदा पटकाविला बिमाग्राम पुरस्कार


तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायतीला बिमाग्राम पुरस्कार सरपंच सुगंधा कुंभार यांचेकडे देताना दिलिप मोरे, सोबत दयानंद पाटील व इतर. 
तेऊरवाडी / प्रतिनिधी
तेऊरवाडी (ता. चंदगड) गावाने बिमा ग्रामची हॅट्रीक केली आहे. या गावाने तिसऱ्यांदा बिमाग्राम पुरस्कार मिळवला आहे. 
आज एल. आय. सी. गडहिंग्लज शाखेचे वरिष्ठ शाखाधिकारी दिलिप मोरे यांच्या हस्ते तेऊरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती सुगंधा कुंभार यांच्याकडे या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. गावाला पुरस्कार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेले  विमा सल्लागार दयानंद पाटोल, विकास अधिकारी अरूण उबाळे यांचा यावेळी ग्रामपंचायतीकडून सत्कार करण्यात आला. ``देशात महागाई वाढत असताना रोज थोडी-थोडी एल. आय. सी. मध्ये केलेली गुंतवणूक भविष्यकाळासाठी वरदान ठरणार आहे. यामुळे जास्तीत-जास्त ग्रामस्थांनी एल. आय. सी. मध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन शाखाधिकारी दिलिप मोरे यांनी बोलताना केले.`` या कार्यक्रमाला उपसरपंच सौ. शालन पाटील, उपशाखा अधिकारी श्री. सोणावने, ग्रामसेविका सुनिता कुंभार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. बजरंग पाटील यांनी स्वागत केले. राजेंद्र भिंगुडे यांनी आभार मानले. 

No comments:

Post a Comment