![]() |
राजगोळी (ता. चंदगड) येथे ओलम (हेमरस) ॲग्रो इंडियाच्या गळीत हंगाम सांगता समारंभात बोलताना बिझनेस हेड भरत कुंडल, शेजारी इतर मान्यवर.
|
ओलम (हेमरस) ॲग्रो इंडियाच्या सन 2019 -20 यावर्षीच्या चालू 10 व्या गळीत हंगामाची सांगता झाली.
या गळीत हंगामात 6,49,850 मेट्रिक टन एवढे उसाचे गाळप झाल्याचे कारखान्याचे बिझनेस हेड भरत कुंडल यांनी सांगितले. ओलम (हेमरस) ॲग्रो इंडियाच्या गळीत हंगाम सांगता कार्यक्रमात ते बोलत होते.
कारखान्याचे बिझनेस हेड भरत कुंडल म्हणाले, ``चंदगड, गडहिंग्लज आणि आजरा तालुक्यासह अन्य सर्व ऊस पुरवठा शेतकऱ्यांच्यामुळे हंगाम यशस्वी झाला. शेतकऱ्यांनी हेमरसवर दाखवलेला विश्वास आणि भागातील सर्व तोडणी वाहतुकदाराची सोबत यामुळेच या वर्षी साडे सहा लाख उसाचे गाळप करू शकलो. हेमरसने आतापर्यंत 29 फेब्रुवारी पर्यंत आलेल्या ऊसाची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहेत. तोडणी, वाहतुकीची बिले 15 फेब्रुवारी पर्यंत जमा केली आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेता उर्वरित बिले लवकरच जमा केली जातील असे सांगितले.`` या सांगता कार्यक्रमाला मुख्य शेती अधिकारी सुधीर पाटील, टेक्नीकल हेड देवराजलू, कामगार संघटना अध्यक्ष संतोष गुरव, कामगार संघटना सभासद मोरबाळे, प्रोसेस हेड शशांक शेकर, एच. आर. हेड अझीझ झुंजानी आणि कारखान्याचे सर्व अधिकारी आणि कामगार वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे शेती विभागाचे अनिल पाटील यांनी सुत्रसंचालन केले. नामदेव पाटील यांनी आभार मानले.


No comments:
Post a Comment