कोरोनाच्या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी खबरदारी म्हणून चंंदगड येथील गुरुवारचा आठवडा बाजार बंद ठेवल्याने बाजार भरत असलेल्या ठिकाणी दिवसभर शुकशुकाट होता. |
कोरोना व्हायरस दिवसेनदिवस रौद्र रुप धारण करत आहे. भारतामध्ये या व्हायरसमुळे अनेजण बाधीत आहेत. त्यामुळे कामानिमित्त परदेशात असलेले व कोरोनामुळे भारतात परतलेल्या नागरीकांची तपासणी करुन त्यांना घरी सोडले जात आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता शहरात कामानिमित्त गेलेले चाकरमानी गावाकडे परतु लागले आहेत. त्यामुळे काही झाले तरी `गड्या आपला गावच बरा` अशी मानसीकता चाकरमान्यांच्यामध्ये आहे. या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी चंदगड व कोवाड येथील आठवडा बाजार बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे बाजारादिवशी गजबजलेल्या चंदगड व कोवाड बाजारपेठ आज दिवसभर काहीशी शांत दिसत नाही. तरीही काही व्यापाऱ्यांनी रस्त्यावरच भाजी घेवून तात्पुरत्या स्वरुपात विकली जात होती. त्यामुळे नागरीकांची काही अंशी सोय झाली.
चंदगड तालुक्यातील अनेक लोक शिक्षण, नोकरी व व्यवसायानिमित्त गाव सोडून पुणे, मुंबई, गोवा, सोलापूर, सांगली, पंढरपूर या ठिकाणी आहेत. यामध्ये पुणे व मुंबईमध्ये सर्वांधित सत्तर टक्के संख्या आहे. या व्हायरसचा प्रादुर्भावामुळे राज्यात पुण्यात सर्वांधिक बाधिक रुग्ण असल्याने व पुणेकरांनी काही दिवस हाटेल व अन्य व्यवहार काही दिवस बंद ठेवल्याने अनेक लोक `गड्या आपला गावच बरा` म्हणून गावी परतु लागले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार बाहेरगावाहून गावात आलेल्या व्यक्तींची माहीती देणे, गावातील पोलिस पाटील यांना बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातून गावी आलेल्या नागरीकांच्यामध्ये काही लक्षणे आढळल्यास त्यांना तातडीने तपासणी करुन घेण्याचे सल्ले दिले जात आहेत. आज दिवसभर बाजारपेठेत अनेकजण तोंडाला मास्क लावून फिरताना दिसत होते. चंदगड नगरपंचायतीच्या वतीने दररोज रिक्षातून ध्वनीक्षेपकावरुन कोरोना व्हायरसबाबत जनजनागृतीचे काम सुरु आहे. यासाठी शहरात मोक्याच्या ठिकाणी कोरोना व्हायसरच्या माहीतीचे फलक लावण्यात आले आहेत. आरोग्य विभागही या व्हायरसबाबत सतर्क असून यंत्रणा कार्यरत आहे.
चंदगड तालुक्यात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण नाही. तरीही खबरदारी म्हणून आवश्यक त्या उपाययोजना आरोग्य विभागामार्फत केल्या आहेत. परदेशातून चंदगड तालुक्यात 14 लोक आले आहेत. त्यांना चौदा दिवस घरातच राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यांना काही त्रास जाणवल्यास सीपीआर कोल्हापूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. सद्या सर्वजण नॉर्मल आहेत. कोणीही अफवा पसरवू नये व अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. के. खोत यांनी सांगितले.
कोरोना व्हायरसबाबत..............सोशल मिडीयावरुनही जनजागृती................
सद्या सोशल मिडीयाचा वापर सर्वजण करतात. एकाच वेळी कमी वेळात अनेक लोकांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मिडीयाचा उपयोग केला जातो. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्वीटर, इस्टाग्राम, हॅलो, यासारख्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवरुन लोकांच्यामध्ये कोरोना व्हायरसबाबत जनजागृती करणारे व्हीडीओ व पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
परदेशात व शहरामध्ये असलेल्या लेकरासाठी देवाला साकडे ...........
शिक्षण, नोकरी व व्यवसायानिमित्त घरापासून बाहेर परदेशात व देशातील शहरामध्ये असलेल्या मुले सुखरुप घरी यावीत. यासाठी खेड्या-पाड्यातील आई-वडीलांनी देवाकडे साकडे घातले आहे. काळजीपोटी रोज सकाळी व संध्याकाळी भ्रमणध्वनीवरुन त्यांच्या खुशालीची माहीती घेतली जात आहे. एरवी मालिकांच्या आवर्जून पाहणारी मंडळीही मालिकावरील आपले लक्ष कमी करुन रोज बातम्या बघून व वृत्तपत्रे चाळून कोरोनाबाबतची आजची स्थिती जाणून घेत असल्याचे चित्र आहे.
No comments:
Post a Comment