कोवाड येथे चौदा हजारांची अवैध दारु जप्त - चंदगड लाईव्ह न्युज

19 March 2020

कोवाड येथे चौदा हजारांची अवैध दारु जप्त


चंदगड / प्रतिनिधी
कोवाड (ता. चंदगड) येथे जुन्या पुलावर विनापरवाना व बेकायदेशीररित्या 14 हजार 250 रुपयांची अवैध दारु चंदगड पोलिसांनी सापळा रचून पकडली. बुधवारी रात्री साडेअकरा वाजता हि घटना घडली. या प्रकरणी नितेश सुरेश कांबळे (वय-27, रा. कोवाड, चंदगड) व प्रदिप पाटील (रा. सावंतवाडी, जि. सिधुदुर्गं) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रुबीना पटेल यांनी याबाबतची फिर्याद चंदगड पोलिसात दिली. 
यासंदर्भात माहीती अशी – कोवाड येथील जुना पुलावरुन नितेश कांबळे व प्रदिप पाटील हे बुधवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास विनापरवाना बेकायदेशीररित्या अवैध दारु महाराष्ट्र राज्याचा करचुकवुन मुद्देमालासह मिळून आले. या कारवाईमध्ये चंदगड पोलिसांनी त्याच्याकडील गोल्डन आईस ब्ल्यु फाईन व्हीस्कीचे 17 नग 7 हजार 650 रुपये किमतीचे, गजु फेनी डबल डिस्टीलेड कंपनीचे 5 हजार 600 रुपयांचे व एक हजार रुपयांचा जीवो फोन असा एकूण 14 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल चंदगड पोलिसांनी जप्त केला. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून पोलिस नाईक संतोष साबळे तपास करत आहेत. 

No comments:

Post a Comment