अडकूर येथे दोन हजार तीनशे रुपयांचे अवैध मद्य जप्त - चंदगड लाईव्ह न्युज

19 March 2020

अडकूर येथे दोन हजार तीनशे रुपयांचे अवैध मद्य जप्त


चंदगड / प्रतिनिधी
अडकूर (ता. चंदगड) येथील एसटी स्टॅडजवळ विना परवाना बेकायदेशीररित्या स्वत:चे फायद्यासाठी डॉक्टर ब्रॉन्डी कंपनीचे अवैध मद्य मिळून आले. यामध्ये डॉक्टर ब्रॉन्डी कंपनीचे 15 नग 90 मिलीची एक बाटली 780 रुपये किमतीचे व डॉक्टर ब्रॉन्डी कंपनीचे 15 नग 180 मिली किमतीची 1560 रुपयांचे असे एकूण 2340 रुपयांचा मुदेमाल जप्त केला आहे. या प्रकरणी संशयित रमेश आप्पाजी पाटील (वय-30, आमरोळी, ता. चंदगड) यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. रुबीना पटेल यांनी याबाबतची फिर्याद चंदगड पोलिसात दिली आहे. बुधवारी रात्री साडेअकरा वाजता हि घटना घडली. घटनेची नोंद चंदगड पोलिसात दिली असून श्री. महापुरे तपास करत आहेत. 


No comments:

Post a Comment