कोवाड (ता. चंदगड) येथे कोरोना विषाणु बचावाबाबत जनजागृती करताना अंगणवाडी सेविका. |
कालकुंद्री (प्रतिनिधी)
जगभर थैमान घातलेल्या विषाणूच्या संसर्गाला थोपवण्यासाठी कोवाड येथे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या वतीने जनजागृती प्रबोधन करण्यात आले. गावात फिरून अंगणवाडी सेविकांनी स्वच्छता राखणे, परिसर व वैयक्तिक स्वच्छतेसाठी निर्जंतुकीकरण साधने वापरणे, वेळोवेळी साबणाने हात धुणे गरज नसताना घराबाहेर न पडणे, खोकताना व शिंकताना किंवा अन्य वेळही तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधणे, जमाव किंवा गर्दी न करणे गर्दीपासून दूर राहणे अशा प्रकारच्या सूचना दिल्या. यावेळी अंगणवाडी सेविका रमेजा मुल्ला, मोहिनी पाटील, चंद्रभागा पाटील, गीता कुंभार, मदतनीस अनुराधा खोराटे, जयश्री पोडजाळे, रोहिणी बुरुड आदींनी उपक्रम राबविला ग्रामस्थांकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यावेळी केंद्रमुख्याध्यापक श्रीकांत व्ही. पाटील, अध्यापक श्रीकांत आप्पाजी पाटील आदींची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment