![]() |
चंदगड पंचायत समितीमध्ये कोरोनाबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करताना प्रतिनिधी व संघटनेचे पदाधिकारी. |
चंदगड येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर. बी. जोशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. के. खोत, प्रसारमाध्यम प्रतिनिधी व संघर्ष समितीचे पदाधिकारी यांच्यामध्ये चंदगड तालुक्यातील कोरोनाची सद्यस्थिती याबाबत चर्चा होवून माहीती जाणून घेण्यात आली.
यावेळी गटविकास अधिकारी श्री. जोशी म्हणाले,``तालुक्यामध्ये 109 ग्रामपंचायतीमध्ये कोरोना व्हायरस बचाव व जनजागृती संदर्भातील माहिती फलक लावले आहे. नागरीकांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी पाचशे आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत घराघरामध्ये जाऊन कोरोना रोगाविषयी माहीती देण्याचे काम सुरु आहे. सर्व सरकारी कार्यालये निर्जंतुकीकरण केले आहेत. आठवडा बाजार व धार्मिक कार्यक्रम बंद ठेवण्यात ग्रामस्थ सहकार्य करताहेत. वेगवेगळ्या शहरातुन आलेल्या नागरीकांना घरातुन काही दिवस सार्वजनिक ठिकाणी न जाता घरातच थांबण्याच्या सुचना दिल्या आहेत. स्वत:ची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, अफवांवर विश्वास ठेवु नका व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.``
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. खोत म्हणाले, ``परदेशातुन चंदगड तालुक्यामध्ये 18 नागरीक आलेले आहेत. त्यांना स्वतंत्र देखरीखाली ठेवलेले असुन त्याचा रोजचा हवाल वरीष्ठ पातळीवर पाठवण्यात येत आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क असल्याचे सांगितले. `` यावेळी चेतन शेरेगार यांच्यासह संघर्ष समितीचे गणेश फाटक व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment