![]() |
चंदगड नगरपंचायतीचे कर्मचारी शहरातील दुकानदारांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करताना. |
चंदगड / प्रतिनिधी
सरकारने करोना व्हायरस परसु नये, यासाठी खबरदारी म्हणून गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. शहरातील दुकाने सुरु असल्यास त्या ठिकाणी नागरीकांची गर्दी होताना दिसत आहे. त्यामुळे हि गर्दी टाळून करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारच्या आदेशानुसार आज चंदगड नगरपंचायतीच्या वतीने दुकानदारांना दुकाने बंद करुन करोनाशी लढण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले. यावेळी नगरपंचायतीचे कर्मचारी शहरातील प्रत्येक दुकानासमोर जावून दुकाने बंद करण्याची विनंती करत होते.
करोना रोगामुळे जगभरात हजारो लोक मृत्यू पडले आहेत. विशेष म्हणजे या रोगावर अद्यापही औषध उपलब्ध या व्हायरसचा संसर्ग होवू नये. यासाठी नागरीकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. देशात सर्वांधिक रुग्ण हे महाराष्ट्रात असून दिवसेनदिवस या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय झाल्याचे समजते. याची त्वरीत अंमलबजावणी करण्यासाठी चंदगड नगरपंचायतीच्या वतीने कर्मचाऱ्यांकरवी शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी कर्मचाऱ्यांना मास्क देवून त्याची सुरक्षाही नगरपंचायतीने केली आहे.
![]() |
चंदगड पोलिस ठाण्याबाहेर फलक लावून नागरीकांना हात धुवून ठाण्यात येण्याचा फलक लावण्यात आला आहे. |
चंदगड पोलिस ठाण्याच्या वतीने नागरीकांना व तक्रारदारांना करोना व्हायरसचा प्राद्रुर्भाव होवू नये. यासाठी आपल्या व इतरांच्या सुरक्षेसाठी प्रथम हात स्वच्छ धुवूनच पोलिस ठाण्यामध्ये प्रवेश करावा अशा आशयाचा फलकच पोलिस ठाण्याच्या गेटवर लावण्यात आला आहे. या ठिकाणी एक पोलिस तैनात असून नागरीकांना हात धुण्यासाठी पाण्याचे जारही ठेवण्यात आले आहेत.
No comments:
Post a Comment