माणगाव येथे नदीपात्रात कपडे धुताना तोल जाऊन पडल्याने महिलेचा बुडून मृत्यू - चंदगड लाईव्ह न्युज

20 March 2020

माणगाव येथे नदीपात्रात कपडे धुताना तोल जाऊन पडल्याने महिलेचा बुडून मृत्यू

रत्‍नाबाई मारुती कांबळे
चंदगड / प्रतिनिधी
माणगाव (ता. चंदगड) येथील रत्‍नाबाई मारुती कांबळे या नदीपात्रात कपडे धुवायला गेल्या असता त्यांचा तोल जाऊन बुडून मृत्यू झाल्याची नोंद चंदगड पोलिस ठाण्यात झाली आहे. चंदगड तालुक्यातील माणगाव येथील ताम्रपर्णी नदी काठावर असणाऱ्या बंधारा शेजारी कपडे धुण्यासाठी गेलेल्या रत्‍नाबाई मारुती कांबळे (वय-48) या महिलेचा कपडे धुताना तोल जाऊन पाण्यात पडून बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना दिनांक 19 मार्च 2020 रोजी दुपारी बारा ते पाच या वेळेत घडली असून मृतदेहाचा शोध करून सापडत नव्हता. आज सकाळी मृतदेह पाण्यावर तरंगताना लोकांच्या नजरेस पडला. लोकांनी मृतदेह काठीच्या सहाय्याने बाजूस करून खात्री केली असता त्या रत्‍नाबाई मारुती कांबळे यांच असल्याची खात्री पटली. यावेळी ताम्रपर्णी नदी काठावर बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. सदर घटनेची नोंद चंदगड पोलिस ठाण्यात झाली आहे.


No comments:

Post a Comment