नांदवडे येथील कु.साक्षी शिंदे हिचे एनएमएमएस शिष्यवृती परीक्षेत उज्ज्वल यश - चंदगड लाईव्ह न्युज

20 March 2020

नांदवडे येथील कु.साक्षी शिंदे हिचे एनएमएमएस शिष्यवृती परीक्षेत उज्ज्वल यश

कु. साक्षी जयवंत शिंदे
चंदगड / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परिषद पुणे मार्फत घेण्यात आलेल्या एन. एम. एम. एस. शिष्यवृती परीक्षेत नांदवडे (ता. चंदगड) येथील श्री भावेश्वरी विद्यालयाची कु. साक्षी शिंदे हिने उज्वल यश संपादन केले. कु. साक्षी जयवंत शिंदे ही विद्यार्थिनी मेरीटमध्ये येऊन शिष्यवृत्ती पात्र झाली आहे. त्यामुळे तिला शासनामार्फत रू. ४८,००० /-ची शिष्यवृत्ती मिळणार आहे.
नांदवडे (ता. चंदगड) येथील भावेश्वरी विद्यालयाची विद्यार्थ्यींनी एन. एम. एम. एस. शिष्यवृती परीक्षेत यश मिळविल्याबद्दल कु. साक्षी शिंदे , वडील जयवंत शिंदे,आई, आजीसह कुटूंबातील सर्वांचे पेढे, पुष्प देऊन अभिनंदन करताना मुख्याध्यापक आर .आय. पाटील, सहाय्यक शिक्षक व्ही. एन. कांबळे व  शालेय समितीचे जेष्ठ सदस्य रामाणा पाटील आदी. 
या परिक्षेमध्ये भावेश्वरी विद्यालयाचे सात विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या सर्वच विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक आर. आय. पाटील,  वर्गशिक्षिका सौ. एस. आर. कोरवी,  डी. एस. गावडे, पी. एम. कांबळे,  व्ही. एन. कांबळे,  के. एन. सावंत, सागर शिवनगेकर यांचे मार्गदर्शन लाभले. शालेय समितीचे चेअरमन एल. डी. कांबळे, रामाणा भरमाणा पाटील,  मारूती झिलु पाटील, शांताराम शिंदे, कृष्णा सुतार यांचे प्रोत्साहन लाभले. कु. साक्षीने मिळविलेल्या यशाबद्दल मुख्याध्यापक आर. आय. पाटील व स्टाफमार्फत तिच्या घरी जाऊन वडील जयवंत शिंदेसह, आई, आजी व घरातील सर्व कुंटुबांचे पेढे व पुष्प देऊन अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment