कोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत 382 जणांची तपासणी - डॉ. प्रसन्न चौगुले - चंदगड लाईव्ह न्युज

21 March 2020

कोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत 382 जणांची तपासणी - डॉ. प्रसन्न चौगुले

डॉ. प्रसन्न चौगुले
कोवाड / प्रतिनिधी    
संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरु असतानाच भारतासहित महाराष्ट्र राज्यात दिवसागणिक कोरोना बाधित रूग्णांची संख्या हि वाढत येत आहे. आजवर महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक बाधित रुग्ण असल्यामुळे प्रशासनाने यापूर्वीच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्या संदर्भात उपाय योजना केल्या असून राज्यातील संपूर्ण आरोग्य विभागातील यंत्रणा हि सक्रीय झाली आहे. या पार्श्वभूमीवर आजवर विविध शहरातुन आलेल्या 382  जणांची तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने केल्याची माहिती डॉ. प्रसन्न चौगुले यांनी दिली. 
आपण सर्वजन आपल्या कुटुंबासाठी महत्वपूर्ण आहात त्यामुळे परिस्थिती समजुन घेवुन सर्वांनी सहकार्य करावे. पुढील 14  दिवस घराबाहेर पडू नये असे आवाहन यावेळी प्राथमिक आरोग्य केंन्द्रा मार्फत शहरातून आलेल्या सर्व नागरीकांना केले. सर्व तपासणी प्रक्रिया डॉ. प्रसन्न चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. यामध्ये औषध निर्माण अधिकारी भरत पाटील, वैद्यकीय प्रयोग शाळा तंत्रज्ञ नरेंद्र रजपूत, आरोग्य सहायक गजानन चव्हाण, शिपाई हणमंत लेंबे, आरोग्य सहायिका सुनीता नाईक, रंजना साळुखे, एएनएम संजीवनी पाटील, आरोग्य सेवक संभाजी आगोशे, शैलेश वाघमारे यांच्यासह आशा स्वयंसेविका शितल जाधव, नंदिनी पाटील, सुनीता पाटील यांच्यासह सर्व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी तपासणी काम मदत केली. कामानिमित्त परदेशात तसेच पुणे, मुंबई सारख्या शहरात असलेले आणि कोरोनाच्या भीतीने आपल्या गावी परतलेल्या नागरिकांची आरोग्य विभागामार्फत तपासणी करण्यात आली. कोवाडसह कर्यात भागातील अनेक चाकरमानी हे वेगवेगळ्या शहरातून गावी परतत आहेत. अशा सर्व नागरिकांची तपासणी कोवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील टीमच्या वतीने करण्यात आली. 

No comments:

Post a Comment