अलबादेवीच्या साठीतील निराधार आजीला मिळाला जगण्यासाठी आधार - चंदगड लाईव्ह न्युज

12 March 2020

अलबादेवीच्या साठीतील निराधार आजीला मिळाला जगण्यासाठी आधार

कमळाबाई मोरे
चंदगड / प्रतिनिधी (नंदकुमार ढेरे)
तीचं वय साठ वर्षे, घरी कमावणारे कोणीच नाही.त्यामुळे जगण्यासाठी या वयातही तीला मोलमोजूरी करावी लागते.श्रीमती कमळाबाई कृष्णा मोरे असे तीचे नाव असून साठीत ही जगण्याची तीची धडपड ईतरांना आदर्शवत आहे.
कमळाबाई यांचे पती कृष्णा मोरे हे मूंबई येथे गिरणी कामगार होते,मूंबई तील गिरणी व्यवसाय बंद पडल्या नंतर ते अलबादेवी येथे पत्नीसह राहण्यास आले.या दरम्यान कृष्णा यांना दम्याचा आजार जडला,उपचारात जी काही थोडी कमाई होती ती संपली,पैसा खर्च करूनही पतीचा आजार बरा झाला नाही.सन 2012 साली त्यांचे निधन झाले.पतीच्या उपचारासाठी शिल्लक होती ती तूटपंजी कमाई ही खर्च झाली होती.त्यामुळे पतीच्या निधनानंतर जगण्यासाठी कमळाबाई ला शेतात मोलमजुरी करावी लागली ,घरी एकटीच असल्याने आजारपणात तीला शेजाऱ्यावर आवलबूंन रहावे लागते, कधी-कधी उसनवारी ही करावी लागते.
कमळाबाई एकदा खूपच आजारी पडल्या, औषधोपचारासाठी पैसाच नसल्याने ती आजारी अवस्थेत ही मोलमजुरी साठी गेली होती,त्यावेळी ती शेतातच चक्कर येऊन पडल्या. यावेळी  सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत नेवगे यानी आसगोळी ता.चंदगड  येथील रहिवासी असलेले व सध्या रायगड येथे हॉटेल व्यवसायीक असलेले लक्ष्मण शेठ वागतकर यांच्या कडुन  औषधासाठी ५०००रुपये मदत मिळवुन दिली.
पण या आजीबाईला जगण्यासाठी काही तरी कायमस्वरुपी आधार देण्यासाठी नेवगे यांची धडपड वाखण्याासारखी आहे, तीला निराधार वृध्दापकाळ योजनेअंतर्गत शासकीय पेन्शन मिळावी म्हणून प्रयत्न केले,कमळाबाई याची सध्या स्थिती तहसिलदार विनोद रणावरे, मंडल अधिकारी अशोक कोळी याना सांगितली, लागलीच कमळाबाई याचे पेन््शन प्रकरण तयार करण्यात आले, आणि ते मंजूर  होऊन तीला पेेेन्शन सूरू करण्यात आली.यासाठी येणारा सर्व खर्च श्री नेवगे यांनी स्वतः केला आणि आज अखेर तिला दिलेला  पेन्शन  चालू करण्याचा शब्द पुर्ण केला. एकिकडे माझं आहे ते माझं आहे, आणि तुझं आहे ते ही माझंचं अशी समाज्यात भावना असताना त्याला छेद देण्याचे काम श्री नेवगे यांनी केले आहे. त्यामूळे सर्व स्तरातून त्यांचे कौतूक होत आहे.

No comments:

Post a Comment