अन्यायाविरुद्ध पेटून उठल्यानेच महिला दिनाचा उदय - अकलक मुजावर यांचे प्रतिपादन - चंदगड लाईव्ह न्युज

11 March 2020

अन्यायाविरुद्ध पेटून उठल्यानेच महिला दिनाचा उदय - अकलक मुजावर यांचे प्रतिपादन

मजरे कार्वे येथे महिला दिन उत्साहात साजरा.
मजरे कार्वे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित महिला मेळाव्यात बोलताना अकलक मुजावर शेजारी इतर.


मजरे कार्वे / प्रतिनिधी
जागतिक महिला दिनाचा उदय महिलांवर होणाऱ्या अन्यायामुळे झाला आहे. सृष्टीची जननी स्त्री आहे. अन्यायाविरुद्ध भारतातील महिलांनी ही पेटून उठलं पाहिजेत. असे आवाहन अकलकभाई मुजावर यांनी केले. मजरे कार्वे ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच शिवाजी तुपारे होते. 
महिलादिनावेळी व्याख्यानाला उपस्थित महिला.
स्वागत व प्रास्ताविक उपसरपंच व पत्रकार निवृत्ती हारकारे यांनी करून ग्रामपंचायती मार्फत महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. यापुढेही महिलांमध्ये जागृती करणे, बचत गटांना सक्षम करणे, अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती बाबत जनजागृती करणे. असे उपक्रम राबवण्यात येतील अशी ग्वाही दिली. अकलक मुजावर पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्री ही मातेसमान आहे, हा उपदेश केला आहे. महाराजांचा हा महामंत्र घेऊन जगलं तर धर्माची गरज नाही. ज्याच्या घरात आई आहे, त्याच्या घरात कशाचीही कमतरता नाही. अन्याय सहन करणाऱ्या स्त्रिया फक्त भारतात आहेत. अन्यायाविरुद्ध पेटून उठले पाहिजेत, तरच छत्रपतींचे स्वराज्य निर्माण होईल. ज्या घरात गाईची पूजा केली जात नाही व ज्या घरात मुलगी नाही ते घर नाही. असेही त्यांनी यावेळी सांगितले. सरपंच शिवाजी तुपारे यांनी आपली मुलं वाईट वागत असतील तर आईनेही कठोर व्हायला शिकल पाहिजेत असं मत व्यक्त केलं. डॉ. पूर्णा पाटील यांनी यावेळी महिलांच्या आरोग्यविषयक समस्या बाबत मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्या प्रियांका हारकारे, पूजा बेनके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात ग्रामसेवक शिवाजी दुंंडगेकर, ग्रामपंचायत सदस्या स्मिता बेनके, बेबिताई बोकडे, अंजली सुतार, रेखा कदम यांच्यासह महिला उपस्थित होत्या. आभार ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग बेनके यांनी मानले.

No comments:

Post a Comment