![]() |
पंकज पाटील |
कुर्तनवाडी (ता. चंदगड )येथील सामाजिक कार्यकर्ते पंकज पाटील यांची परीट समाजाच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली .अखिल भारतीय धोबी संघाचे संचालक दत्तात्रय बन्ने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोल्हापूर येथे परिट समाजाच्या झालेल्या जिल्हा स्तरीय मेळाव्यात जिल्हाध्यक्ष आनंदराव शिंदे यानी त्यांना निवडीचे पत्र दिले. पकंज पाटील यानी परीट समाजाच्या विविध आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवुन समाजाचा प्रश्न शासन दरबारी सोडवण्याचा प्रयत्न केला. गाडगेबाबांच्या विचारांना दिशा देण्याचे काम त्यांनी केलं.परीट समाजाचे संघटन करण्यांत त्यांचे मोलाचे सहकार्य आहे, कोल्हापूर जिल्हा परीट समाजाचे अध्यक्ष आनंदराव शिंदे यांच्या हस्ते निवडीचे पत्र त्यांना देण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष सागर परीट जिल्हा अध्यक्ष आनंदराव शिंदे जिल्हा सेक्रेटरी अभिजीत सांगावकर आदि सामाजचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment