खामदळे येथून 80 पाळीव डुकरांची चोरी, पाच लाखांचे नुकसान, अज्ञाता विरोधात चंदगड पोलिसात गुन्हा नोंद - चंदगड लाईव्ह न्युज

02 March 2020

खामदळे येथून 80 पाळीव डुकरांची चोरी, पाच लाखांचे नुकसान, अज्ञाता विरोधात चंदगड पोलिसात गुन्हा नोंद


चंदगड / प्रतिनिधी
खामदळे (ता. चंदगड) येथील बाग नावाच्या शेतातील पत्र्याचे शेडमध्ये असलेली 80 पाळीव डुकरे अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची फिर्याद मालक सचिन शंकर पाटील यांनी चंदगड पोलिसात दिली आहे. शनिवारी सायंकाळी चार ते रविवारी सकाळी आठच्या दरम्यान मुदतीत हि घटना घडली. 
यासंदर्भात माहीती अशी – सचिन पाटील यांचे बाग नावाच्या शेतात गट नं. 239 मध्ये पत्र्याचे पीकफार्म शेड आहे. त्यांच्या घरापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर हे फार्म आहे. या फार्ममध्ये शंभरहून अधिक पाळीव डुकरे पाळली आहेत. अज्ञातांनी शनिवारी या परिसरात कोणीही नसल्याचे पाहून पत्र्याच्या शेडची दरवाज्याची जाळी काढून शेडमधील 20 मादी जातीची डुकरे व 60 डुकरांची पिले अशी 80 डुकरे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहेत. त्यामुळे मालक सचिन पाटील यांचे 5 लाख 8 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत अज्ञात चोरट्यांच्या विरोधात चंदगड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून पोलिस हवालदार श्री. साबळे यांनी तपास करीत आहेत. 


No comments:

Post a Comment