चंदगड येथे शुक्रवारी पोल्ट्री व्यावसायिकांची बैठक - चंदगड लाईव्ह न्युज

11 March 2020

चंदगड येथे शुक्रवारी पोल्ट्री व्यावसायिकांची बैठक


चंदगड / प्रतिनिधी
चीनमध्ये फैलावलेल्या कोरोना व्हायरस रोगामुळे चंदगड तालूक्यातील  पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आला असून मिल्ट्री धारी कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे पोल्ट्री  चंदगड तालुक्यातील पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आला आहे. त्या विषयावर चर्चा करण्यासाठी सर्व पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांची बैठक शुक्रवार 13 मार्च 2020 रोजी सकाळी अकरा वाजता चंदगड श्री देव रवळनाथ मंदीर येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला  कुक्कुटपालन चालक मालकांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन संचालक संजय ढेरे व्यावसायिक यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment