|  | 
| हलकर्णी एमआयडीसी मध्ये राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहावेळी उपस्थित कर्मचारी. | 
हलकर्णी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहती  येथील पायोनियर रूफिन्ग फॅक्टरी मध्ये राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. आरोग्य आणि सुरक्षा याबद्दल कामगारांमध्ये जागृती करण्यासाठी सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. कारखान्यामध्ये काम करताना सुरक्षा व आरोग्याची काळजी कशी घ्यावी, सुरक्षा नियमांचे पालन कसे करावे याबाबत  एक्सट्रीम सेक्युरिटीचे सुरक्षा प्रशिक्षण अधिकारी विलास जाधव व रघुनाथ देसाई  यांनी मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाचे आयोजन कारखाना व्यवस्थापक प्रल्हाद नेसरकर, शशिकांत सुतार व लवकुमार भोसले यांनी केले. यावेळी कार्यकारी संचालक दिनेश नटराज, कृष्णा पाटील,  एन. आर. पाटील  यांच्यासह कामगार उपस्थित होते.
 

 
 
 
 
 
 
No comments:
Post a Comment