![]() |
चंदगड तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिकांना सरकारी आर्थिक मदत द्यावी, या मागणीचे निवेदन तहसिलदारांना देताना मनसे व विविध संघटनांचे पदाधिकारी. |
कोरोना व्हायरसने जगात त्याचबरोबर भारतात हाहाकार माजवला आहे. कोरोनोच्या भीतीचा फटका मात्र देशातील विविध उद्योग व्यवसायांना बसला आहे. कोरोनाच्या भीतीचा सगळ्यात जास्त फटका चंदगड तालुक्यातील पोल्ट्री व्यवसायाला बसला आहे. कोरोनाच्या भीतीने लोकांनी चिकन खायचे सोडून दिले आहे. त्यामुळे तालुक्यातील पोल्ट्री व्यवसाय मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. त्यामुळे कोरोनाच्या भीतीने डबघाईला आलेल्या पोल्ट्री व्यावसायिकांना सरकारी आर्थिक मदत मिळावी. याबाबतचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह विविध संघटनांनी तहसिलदारांना याबाबतचे निवेदन दिले.
तालुक्यातील बेरोजगार तरुणांनी मोठ्या प्रमाणात बँकंची कर्ज घेवून पोल्ट्री व्यवसाय सुरू केला आहे. कधी बर्ड फ्ल्यू तर आता कोरोना व्हायरस या मुळे लोकांनी भीतीने चिकन खायचे सोडल्यामुळे पोल्ट्रीतील कोंबड्यांची उचल होणे हळु-हळु बंद होत आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकावर मोठे संकट आले आहे. अक्षरशः १०० रुपयाला ५ कोंबडया विकण्याचा प्रयत्न पोल्ट्री व्यावसायिक करत आहेत. मात्र त्यालाही ग्राहकांचा प्रतिसाद नाही. त्यामुळे पोल्ट्री व्यवसाय पूर्णपणे कोलमडून पडला आहे. सरकारची आर्थिक मदत नाही मिळाल्यास या पोल्ट्री व्यावसायिकांवर आत्महत्येची वेळ ओढवणार आहे. त्यांचा बँकांचा कर्जचा बोजा वाढत जाणार आहे. तरी पुढील धोका ओळखून शासनाने या समस्त व्यावसायिकांवर भरीव अशी आर्थिक मदत देवून या प्रसंगातून सावरावे. याबाबत विचारविनियम करुन त्वरीत निर्णय घ्यावा. अन्यथा मनसेच्या वतीने रस्तावर उतरून आंदोलन करण्यात येईल अशा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष पिनु पाटील, चंदगडचे उपनगराध्यक्ष फ़िरोज़ मुला, कृति समितीचे अध्यक्ष गणेश फाटक, तालुका अध्यक्ष राज सुभेदार, तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर धुरी, सहकार सेनेचे अध्यक्ष परशराम मळविकर, वाहतुक सेनेचे उपाध्यक्ष सचिन गुरव, प्रसिध्दी प्रमुख योगेश बल्लाळ, इसापूरच्या सरपंच सौ. स्वप्नाली गवस, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष राजाराम गोंधळी यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment