डॉ. अरविंद पठाणे यांना जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट स्त्री-पुरुष शस्त्रक्रियेचा पुरस्कार - चंदगड लाईव्ह न्युज

11 March 2020

डॉ. अरविंद पठाणे यांना जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट स्त्री-पुरुष शस्त्रक्रियेचा पुरस्कार

कोल्हापूर  येथे डॉ. अरविंद पठाणे जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट स्त्री-पुरूष शस्त्रक्रियेचा पुरस्कार स्विकारल्यानंतर आपल्या सहकाऱ्यासमवेत.
चंदगड / प्रतिनिधी
रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा आहे, हे ब्रीद अंगीकारलेले  माणगाव  (ता. चंदगड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अरविंद पठाणे याना कोल्हापूर जिल्हा परिषद यांचेकडून स्त्री-पुरुष नसबंदीसाठी असलेला शस्त्रक्रियेचा  उत्कृष्ट पुरस्कार देवून गौरवण्यात आले. जि. प. अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, सीईओ अमन  मित्तल, महिला बालकल्याण सभापती पद्माराणी पाटील, समाज कल्याण सभापती सौ.स्वाती सासणे यांच्या उपस्थितीत शाहू सांस्कृतिक सभागृहात झालेल्या  एका शानदार सोहळ्यात  हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
माणगाव  परिसरातील जवळपास ४० हून अधिक खेडयामध्ये या प्राथमिक आरोग्य केंद्रांतंर्गत वैद्यकिय सेवा पुरवली जाते. या केंद्राचे वैदयकिय अधिकारी डॉ. अरविंद पठाणे  म्हणजे येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचा खरा आधारवड. माणगाव पासून एक किलो मीटर अंतरावर फोंड्या माळावर वसलेल्या या आरोग्य केंद्रात डॉक्टर नेहमी उपलब्ध असल्याने रोज जवळपास १०० रूग्ण  तपासून त्यांच्यावर उपचार केले जातात. यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे रुग्णांचा प्रचंड ओढा आहे. पुरुष-स्त्री नसबंदी शस्त्रक्रिये  मध्ये तर डॉ. पठाणे  यांचा हातखंडा आहे. माणगावसह कोवाड,  तुडये येथील आरोग्य केंद्रातही ते स्त्री- पूरूष नसबंदीचा शस्त्रक्रिया करतात. आज पर्यंत त्यानी पंधरा हजारहून अधिक विविध यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. महापुराच्या कालावधीतही  डॉ. पठाणे  आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी दिवस-रात्र वैदयकिय सेवा पुरवली होती, सरकारच्या विविध लसीकरण मोहिमा, विविध प्रशिक्षणे, राष्ट्रीय कार्यक्रम डॉ. पठाणे यांच्या नेतृत्वाखाली या आरोग्य केंद्राने पूर्ण केले असल्याने निश्चितच हा मिळालेला पुरस्कार म्हणजे येथील वैदयकिय अधिकारी व त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांचा गौरव म्हणावा लागेल. 
२००० साली माणगाव  प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून रूजू झालेले डॉ. अरविंद पठाणे यानी वीस वर्षे एकाच आरोग्य केंद्रात इसमाने इतबारे सेवा बजावून परिसरात गरीबांचा डॉ.क्टर ही  पदवी मिळवली आहे. या आदीही  माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला डॉ. पठाणे यांच्या सांघिक कामगिरीमुळे  २००५/०६ साली डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार, ग्रामआरोग्य संजिवनी पुरस्कार, २०११/१२ साली उत्कृष्ट स्त्री-पुरूष शस्त्रक्रियेचा पुरस्कार, २०१३/१४ साली उत्कृष्ट कार्याबद्दल चा पुरस्कार कोवाड प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला आहे. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भाऊसाहेब कम्पी,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ, सौ.सुनिता रेडेकर, शिवानी भोसले, चेतन पाटील, सौ. रेश्मा  देसाई, कल्पना चौगुले, डॉ. उषादेवी कुंभार,  डॉ. फारूख देसाई  आदी मान्यवर व माणगाव  प्राथमिक आरोग्य केंद्राचे  सर्व कर्मचारी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment