जट्टेवाडी येथून तरूणी बेपत्ता - चंदगड लाईव्ह न्युज

10 March 2020

जट्टेवाडी येथून तरूणी बेपत्ता


चंदगड / प्रतिनिधी
जट्टेवाडी (ता. चंदगड) येथून निकिता संभाजी पाटील (वय 20 वर्षे, रा. जट्टेवाडी, ता. चंदगड) ही तरुणी घरी कोणीही नसल्याचे पाहून 9 मार्च 2020 रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेच्या दरम्यान राहते घरातून कोणाला काहीही न सांगता निघून गेली आहे. ती अद्याप घरी आलेली नाही. त्यामुळे त्यांचे नातेवाईक, पै-पाहुणे, मित्र-मैत्रीणी यांच्याकडे चौकशी केली असता ती कोठेही न मिळून आल्याने सौ. प्रेमा पाटील यांनी याबाबतची तक्रार चंदगड पोलिसात दिली आहे. तिचे वर्णन पुढीलप्रमाणे – रंगाने गव्हाण वर्णाचे, अंगाने सडपातळ, उंची पाच फूट दोन इंच, कानात सोन्याच्या रिंगा, नाक सरळ लांब, नाकात पांढरा धातुचा मुगट, अंगात नेसणेस काळा-पांढरा रंगाचा चेक्सचा पंजाबी ड्रेस, पायात पैंजण व चप्पल, मराठी व हिंदी भाषा बोलते. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून पोलीस नाईक श्री. गाडवे तपास करत आहेत.


No comments:

Post a Comment