![]() |
चंदगड येथे रवळनाथ मंदिराशेजारील खुल्या जागेत शिवकालीन युध्दकला प्रात्यक्षिके व स्व-संरक्षाचे धडे देण्यात आले. |
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड येथील रवळनाथ मंदिरात रविवारी महिलादिनी शिव शक्तीस्थळ आणि वेंगरूळ (ता. भुदरगड) येथील सव्यसाची गुरुकुलम यांच्यातर्फे भारतीय व्यायाम आणि स्व-संरक्षण शिवशक्तीस्थळाजवळ गुरुकुलमचे विद्यार्थींनी मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक दाखवले. गुरुकुलमच्या माध्यमातून गावागावात भारतीय व्यायाम आणि शिवकालीन शस्त्र प्रशिक्षण देण्याबाबत जनजागृती केली जात आहे.
यावेळी वेंगरूळ (ता. भूदरगड) येथील सव्यासाची गुरुकुलाचे प्रमुख लखनजी जाधव म्हणाले, ``समाज निर्मितीसाठी शक्ती, युक्ती, चातुर्य आणि विवेकाची गरज असते. कोणतीही कला व विद्या अध्यात्माशिवाय अपूर्ण आहे. वेदापासून उपनिषेदापर्यंतच्या ग्रंथसंपदेत सामाजिक भानाची शिकवण आहे. भगवद्गीता हा मानवी जीवनाचा सार आहे. शस्त्रं आपल्याला संयम शिकवतात. युध्द टाळतो आणि तरीही जो विजयी होतो, तोच सर्वश्रेष्ठ सेनापती असतो. शस्त्र आणि शास्त्राची सांगड घालून वाटचाल केली तरच देशाची प्रगती होते असे विचार व्यक्त केले.`` रविवारी सकाळी ८ ते ११ यावेळेत रवळनाथ मंदिराजवळ प्रात्यक्षिक झाले. दुपारी १२. ३० ते २. ३० या वेळेत महिलांसाठी विशेष परिसंवादाचे आयोजन केले. चंदगडमध्ये केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्हाला पुतळा उभा करायचा नाही तर त्यांचे विचार लोकांमध्ये रूजवायचे आहेत. म्हणूनच मल्लखांब व्यायामशाळा, ऐतिहासिक पुस्तकांचा खजाना असलेले ग्रंथालयही चालवायचे आहे असे उद्योजक सुनील काणेकर यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमासाठी आर्कीटेक्ट धनंजय वैद्य यांनी यासाठी पुढाकार घेतला असून उद्योजक सुनील काणेकर, अनिकेत घाटगे, प्रा. जोतिबा पाटील, भास्कर कामत, नामदेव मांगले, शांताराम भिंगुडे यांच्यासह ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment