हलकर्णी औद्योगिक वसाहत नियोजित ट्रामा केअर सेंटरसाठीचे आंदोलन, लेखी आश्वासनानंतर मागे - चंदगड लाईव्ह न्युज

12 March 2020

हलकर्णी औद्योगिक वसाहत नियोजित ट्रामा केअर सेंटरसाठीचे आंदोलन, लेखी आश्वासनानंतर मागे

पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे नियोजिन ट्रॉमा केअर सेंटरसाठी पुुकारलेले आंदोलन आश्वासनांतर मागे घेण्यात आले. याबाबतची लेखी पत्र स्विकारताना आंदोलक गणेश फाटक व संघर्ष समितीचे कार्यकर्ते. 
चंदगड / प्रतिनिधी
हलकर्णी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहतीमध्ये (पाटण फाटा) येथे नियोजित ट्रॉमा केअर सेंटर (सुसज्य रुग्णांलय) सरकारच्या उदासिन धोरणामुळे रखडले आहे. या रूग्णांलयाच्या रखडलेल्या कामाला गती येण्यासाठी चंदगड तालुका संघर्ष कृती समितीच्या वतीने आज पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे धरणे आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान या अंदोलनाची दखल घेऊन चंदगड ग्रामीण रूग्णांलयाचे प्रभारी अधिक्षक ए. एस. गायकवाड यानी आंदोलन स्थळी भेट देऊन ट्रामा केअर सेंटर लागणारी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रीया सुरू झाल्याचे लेखी पत्र आंदोलकाना दिले.
लेखी पत्र स्विकारून आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा अंदोलनकर्ते गणेश फाटक यांनी केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारने या कामामध्ये दिरंगाई केल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघर्ष कृती समीतीने दिला. गणेश फाटक,  कार्याध्यक्ष दौलत दळवी, सचिव आकाश भोगण, कोषाध्यक्ष जोतिबा गोरल, परशराम भेंडुलकर, बाबुराव पाटील, प्रणाली कांबळे, कुमारी भोसले, शिवाजी पाटील, रमेश पाटील, प्रकाश कोल्हाळ, सुहास गुरव, शिवाजी हेरेकर आदी कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता.

No comments:

Post a Comment