![]() |
अवजड वाहनांच्या वाहतूकीने चिंचणे ते दुंडगे हा खराब झालेला रस्ता. |
गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या वाळूच्या वाहतुकीमुळे दुंडगे -चिंचणे ते कामेवाडी रस्ता उध्वस्थ झाला आहे . या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात वाळूमिश्रीत धूळीचे साम्राज्य पसरले असल्याने याचा प्रचंड त्रास येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशाना होत आहे .
चिंचणे परिसरात मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन चालू आहे . त्यामूळे उत्खनन केलेल्या वाळूची वाहतूक या रस्त्यावरून होत आहे . वारंवार होणाऱ्या अवजड वाहनाच्या वाहतुकीने हा रस्ता खराब झाला आहे . वाळू क्षेत्र असल्याने वाहन जात असेल तर प्रचंड प्रमाणात धूळीचे साम्राज्य पसरते . याचा त्रास दूचाकीस्वाराना तसेच शालेय व महाविद्यालयीन यूवकाना होत आहे. या धुळीमध्ये एखादा मोठा अपघात होण्यापूर्वी या रस्त्याची तात्काळ दूरूस्ती करावी व या रस्त्यावर पाणी मारण्यात यावे अशी मागणी या परिसरातील प्रवाशी व ग्रामस्थांनी केली आहे.
No comments:
Post a Comment