बुक्कीहाळ : मास्क वाटपप्रसंगी प्रा. यल्लाप्पा पाटील, आप्पाजी पाटील, शिवाजी पाटील, चिलमे आदी. |
बुक्कीहाळ बुद्रुक (ता. चंदगड) या गावचे रहिवासी व उत्तुर (ता. गडहिंग्लज) येथील डॉ. जे. पी. नाईक महाविद्यालयाचे प्रा. यल्लाप्पा पाटील यांनी गावातील लोकांना मास्क वाटप केले.
प्रा. यल्लाप्पा पाटील, बेळगाव तालुक्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. आपला परिसर बेळगाव तालुक्याला लागून आहे, त्यामुळे कोरोना बाबत प्रत्येकाने सतर्क रहाणे ही काळाची गरज आहे. यावेळी जवान परशराम पाटील, पोलीस पाटील शिवाजी पाटील, सरपंच आप्पाजी पाटील, ग्रामसेवक रवी चिलमे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment