नेसरी येथे कै. आर. बी. नाईक फौंडेशनच्या वतीने जीवनावश्यक वस्तुचे वाटप करताना स्वयसेवक. |
सध्या देशासहित राज्यात कोवीड 19 च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. विविध तालुक्यातून अनेक स्तरातून मदतीचा ओघ हा सुरूच आहे. नेसरी व मुंबई येथील कै. आर. नाईक फौंडेशनच्या वतीने नाईक बेरड समाजातील निराधार तसेच गरजू अशा एकूण 40 कुटुंबाना आज मास्क व जिवनावश्यक वस्तूंच्या किट चे वाटप करण्यात आले.
लॉकडाऊनमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबासमोर बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे,अशा काही कुटुंबाना तांदूळ,आटा,तिखट,तेल,चहा,साखर, डाळ,अंघोळीचा साबण इ. जीवनावश्यक वस्तूंच्या 40 किट चे वाटप करण्यात आले. नेसरी मध्ये मोलमजुरी करून सदर कुटुंबे ही उदरनिर्वाह करत आहेत. आजच्या निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीत हातभार लागावा या उद्देशाने या किटचे वाटप करण्यात आले असून कोरोना आजाराची माहिती देऊन जनजागृती ही केली. अशाच प्रकारे इथून पुढेही गरजू व्यक्तींच्या कामी येणार असल्याचे कै.आर .बी.नाईक फौंडेशन चे अध्यक्ष सचिन राणबा नाईक यांनी सांगितले. कै. आर. बी. नाईक फौंडेशनने आजवर अनेक लोकांना अडचनीमध्ये हात पुढे केले असून समाजाप्रती असलेली बंधीलकी जपलेली दिसून येत आहे. अशा प्रकारे अनेक हात हे आज समाजातील विविध स्तरातून एकत्र येण्याची गरज आहे. तरच आपण कोरोना विरुद्धची लढाईवर आपण यशस्वी पणे मात करू शकेन.
No comments:
Post a Comment