चंदगड तालुक्यातील शिनोळी येथे शासकीय महाविद्यालय सुरू होणार, सिमा भागातील विद्यार्थ्यांची होणार सोय - चंदगड लाईव्ह न्युज

19 July 2020

चंदगड तालुक्यातील शिनोळी येथे शासकीय महाविद्यालय सुरू होणार, सिमा भागातील विद्यार्थ्यांची होणार सोय


उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करताना खासदार संजय मंडलिक
तेऊरवाडी -संजय पाटील
      शिनोळी ता.चंदगड येथे सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शासकीय महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सीमा भागात सुरु करण्याचे आश्वासन आज कोल्हापूर येथे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले.  
 येत्या शैक्षणिक वर्षांपासूनच महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासकीय महाविद्यालय सुरू करण्यात येईल असे मंत्री  उदय सामंत यांनी स्पष्ट केले . याबाबत खा मंडलिक म्हणाले शिनोळी येथे या प्रस्तावित महाविद्यालयासाठी दहा एकर जागा उपलब्ध आहे . त्या जागेसह अन्य एका जागेची पाहणी शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने केली आहे.महसूल प्रशासन आणि विद्यापीठ समिती यांच्याशी बोलणी झाली असून या दोन्ही जागेपैकी एका जागेवर या शैक्षणिक वर्षांपासून शासकीय।महाविद्यालय सुरू करून पारंपरिक अभ्यासक्रमापेक्षा कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे . या निर्णयामुळे गडहिंग्लज उपविभागसह ग्रामीण- डोंगराळ कोंकण गोवा आणि महाराष्ट्र- कर्नाटक सीमाभागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे.त्यांना शिक्षणाच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत . आजच्या कोल्हापूर दौऱ्यात मंत्री सामंत यांनी खा प्रा संजय मंडलिक व सुरेश कुराडे यांना आश्वसित करीत विद्यापीठ प्रशासनाला तातडीने शिनोळी ता.चंदगड येथे शासकीय महाविद्यालय सुरू करण्यात येईल त्यादृष्टीने सूचना दिल्या .मंत्री सामंत यांचे स्वागत कोल्हापूरचे खास संजय मंडलिक यांनी करून त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली . शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत आले असता त्यांना नविन शैक्षणिक वर्षात रिक्त पदे भरण्यासाठी आरक्षण निश्चिती करणे गरजेचे असल्याने शिवाजी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांच्या बिंदूनामावली तपासणी मार्गदर्शन होणेबाबतचे निवेदन देण्यात आले . यावेळी शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रताप उर्फ भैय्या माने , जिल्हा बँकेचे संचालक पी.जी. शिंदे , अॅड . सुरेश कुराडे उपस्थित होते . आम राजेश पाटील यांनीदेखील हे शासकीय महाविद्यालय सीमाभागातील विद्यार्थ्यांना सोयीचे ठरावे यासाठी प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment