कालकुंद्री येथे पर्यावरण पूरक गणेश विसर्जनाची तयारी - चंदगड लाईव्ह न्युज

26 August 2020

कालकुंद्री येथे पर्यावरण पूरक गणेश विसर्जनाची तयारी

कालकुंद्री येथे ताम्रपर्णी नदी घाट स्वच्छ करताना नागरिक.
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
 गंदगी मुक्त भारत अभियान अंतर्गत कालकुंद्री ता. चंदगड ग्रामपंचायत मार्फत पर्यावरण पूरक गणेश विसर्जनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. याअंतर्गत ताम्रपर्णी नदीवरील घाटाची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली. गेल्या चार-पाच वर्षात नदीघाटावर गणेश विसर्जनाच्यावेळी निर्माल्य नदीत टाकण्यास बंदी घालण्यात आली असून सर्व निर्माल्य एकत्र जमा करून त्याचा कंपोस्ट खतासाठी उपयोग केला जातो. या उपक्रमाचा आदर्श परिसरातील काही गावांनी घेतला असून आहे त्यामुळे ताम्रपर्णी नदी दूषित  होण्याचे प्रमाण कमालीचे घटले आहे. नदीघाटावर काहिलीत गणेश मूर्ती विसर्जन करून तेथेच दान करण्याचा उपक्रमही सुरू आहे. याकामी ग्राम विकास अधिकारी व्ही बी भोगण, प्रशासक डी एम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरु आहे. नदीघाट स्वच्छता उपक्रमात सागर पाटील, फकीरा लोहार, नरसु कांबळे, उदय सुतार, कल्लाप्पा बागडी, कल्लाप्पा सुतार, पुंडलिक गोपाळ पाटील,  सुगंधा महादेव कांबळे, सुनिता कल्लाप्पा पाटील, नंदा शिवाजी पाटील, हमीदाबी सद्रु मोमीन, मनीषा सुरेश जाधव, इरफान मोमीन, शोभा रघुनाथ पाटील, लक्ष्मी कदम, बाबाजान मुल्ला आदींनी श्रमदान करून घाट स्वच्छ केला.

No comments:

Post a Comment