किल्ले कलानिधिगडावर दुर्गविर प्रतिष्ठान व वनविभाग पाटणे यांच्यामार्फत वृक्षारोपण - चंदगड लाईव्ह न्युज

26 August 2020

किल्ले कलानिधिगडावर दुर्गविर प्रतिष्ठान व वनविभाग पाटणे यांच्यामार्फत वृक्षारोपण

किल्ले कलानिधिगडावर दुर्गविर प्रतिष्ठान व वनविभाग पाटणे यांच्यामार्फत वृक्षारोपण करण्यात आले.
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
         कलीवडे ( ता.चंदगड ) येथील किल्ले कलानदींगडाच्या पायथ्याशी गावाजवळील कलानिधिगडाच्या घेऱ्यात दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे आणि वनविभाग व ग्रामपंचायत कलीवडे यांच्या सहकार्याने वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात आली. यावेळी वनअधिकारी वनक्षेत्रपाल दत्ता पाटील,वनपाल बी आर भांडकुळी,वनरक्षक डि एस रावळेवाडकर, वनसेवक पुंडलिक नागुर्डेकर, विश्वनाथ नावेंंकर यांच्या मार्गद्शनाखाली दुर्गवीर प्रतिष्ठान चे अध्यक्ष संतोष हसुरकर संदीप गावडे,अजित पाटील, यांच्या हस्ते साठ वृक्षांची लागवड करण्यात आली.या वेळी राजू सुतार,पुंडलिक भांबर, भागोजी,बाबू झोरे, अजय सातार्डेकर, राजू पेडणेकर,नामदेव सदावर, नितीन आदींसह दुर्गवीर उपस्थित होते.


No comments:

Post a Comment