एसटी बस |
चंदगड / प्रतिनिधी
कोरोनामूळे गेले सहा महिन्यांपासून बंद असलेली चंदगड आगारातील एस.टी.ची वाहतूक कालपासून सुरू केली आहे.या लांब पल्ल्यां बरोबर तालुक्यातंर्गत वाहतुक सेवेचा तालुक्यातील प्रवाशांनी लाभ घ्यावा , असे आवाहन आगारप्रमुख गौतम गाडवे यानी केले आहे . कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून एस .टी .बस फेऱ्यांचे वेळापत्रक कोलडमडलेलेच आहे , मध्यंतरी काही दिवस स्थानिक बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या होत्या . सुरुवातीला अगदी अल्प प्रतिसाद मिळाला . त्यानंतर पुन्हा एकदा बसफेऱ्या सुरू केल्या असून आता बऱ्यापैकी प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे . दि . २१ पासून लांब पल्ल्याच्यागाड्या सोडण्यास सुरुवात केली आहे .चंदगड मधून कल्याण,पुणे,निगडी,कोल्हापूर ,गडहिग्लज या लांब पल्ल्याच्या गाड्यासह चंदगड-शिनोळी,नांदवडे, जांबरे, कोवाड या तालूक्यातंर्गत मार्गावरही एस टी सेवा सूरू करण्यात आली आहे. यासाठी कोणत्याही प्रकारे तिकीट दर वाढवला नसून जून्या दरातच प्रवासाना सेवा मिळणार आहे. याशिवाय एखाद्या गावामध्ये १५ किंवा २० प्रवासी मुंबई किंवा पुण्याला जाणार असतील तर त्यांच्याकरिता बस उपलब्ध करून देण्याची व्यवस्थाही चंदगड आगाराकडून करण्यात आल्याची माहिती आगारप्रमुख श्री गाडवे यानी दिली.अधिक माहितीसाठी चंदगड आगार शी( ०२३२०-२२४१२४) संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment