खासदार मंडलिक यांना कोरोना, चंदगड तालुक्यातील संपर्कात आलेल्यांना दक्षता घेणे गरजेचे - चंदगड लाईव्ह न्युज

26 August 2020

खासदार मंडलिक यांना कोरोना, चंदगड तालुक्यातील संपर्कात आलेल्यांना दक्षता घेणे गरजेचे

संजय मंडलिक
चंदगड / प्रतिनिधी
         चंदगड तालुक्यातील चंदगड विधानसभा मतदार संघातील चंदगड व गडहिंग्लज  येथील आरोग्य विभागाला आमदार फंडातून मंजूर केलेली  रूग्ण वाहीका प्रदान कार्यक्रमासाठी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर ,खास.संजय मंडलिक व आम.राजेश पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थितीत होते. या प्रमुख उपस्थितापैकी खास.मंडलिक यांना कोरोना लागण झाली आहे त्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मध्ये चिंता निर्माण झाली आहे.खास.मंडलिक यांनीही  संपर्कात आलेल्यांना काळजी घ्यावी व सुचनेंचे पालन करावं असे आवाहन केले आहे.
          खास. मंडलिक,त्यांच्या पत्नी व मुलगा यांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत त्यामुळे खास.मंडलिक यांच्या संपर्कात आलेल्यांनी सर्वांची तपासणी करून घेणे गरजेचे आहे.चंदगड विधानसभा मतदारसंघातील चंदगड व गडहिंग्लज तालुक्यातील आरोग्य विभागाला आमदार राजेश पाटील यांनी आपल्या आमदार फंडातून रुग्ण वाहीका खास.मंडलिक यांच्या हस्ते प्रदान कार्यक्रम गुरुवारी २०आगष्ट रोजी चंदगड व गडहिंग्लज येथे झाला होता.या कार्यक्रमाला आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर,आम.पाटील,जि.प उपाध्यक्ष संजय पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे,संघटक संग्राम कुपेकर, प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार विनोद रणावरे नायब.तहसिलदार राजगोळकर यासह   स्थानिक पदाधिकारी आरोग्य विभागाला डॉक्टर कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.आता यापैकी अगदी जवळून  संपर्क आलेल्यांनी आपली तपासणी करून घेणे गरजेचे आहे. चंदगड तालुक्यातील संपर्कात आलेल्यांनी काळजीपूर्वक राहणे अत्यंत आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment