![]() |
मुकुंद भेलके |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाला पुणे येथील मुकुंद एकनाथ भेलके यांच्याकडून 137 पुस्तके भेट मिळाली. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागात वरिष्ठ लेखा परीक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेल्या भेलके यांना कालकुंद्री गावचे पण सद्या पुणे स्थित हरिश्चंद्र पांडुरंग पाटील यांचेकडून कालकुंद्री येथे शासनाची कोणतीही मदत नसताना केवळ लोकसहभागातून वाचनालय सुरू आहे.
जाहिरात
जाहिरात
याची माहिती मिळताच भेलके यांनी विनाविलंब ज्ञानेश्वरी, अभंगाथा, नरहरी सोनार महाराज, मुसाफिर, यश तुमच्या हातात, स्वातंत्र्याचे मोल, कथा ऑलिम्पिकच्या, मादाम मेरी क्युरी, खशाबा, चिंतनपर्व आदी १३७ वाचनीय ग्रंथ पुस्तके पाठवून दिली. वाचन संस्कृती टिकवण्यासाठी आगळ्या पद्धतीने धडपडणाऱ्या भेलके यांनी सामाजिक बांधिलकीतून कालकुंद्री वाचनालयाच्या ग्रंथ संपदेत भर घातल्याबद्दल वाचनालयाचे अध्यक्ष के जे पाटील, संचालक मंडळ व ग्रामस्थांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

No comments:
Post a Comment