वारंवार वरून पाणी गेल्यामुळे धोकादायक बनलेल्या घुल्लेवाडी निट्टूर मार्गावरील मोरीची स्थिती दाखवताना मनसे चे कार्यकर्ते तुकाराम पाटील. |
कोवाड : सी एल वृत्तसेवा
घुलेवाडी ते निटूर दरम्यान च्या ओढ्यावरील मोरीची उंची वाढवण्याची मागणी दोन्ही गावचे ग्रामस्थ, प्रवासी व वाहनधारकांनी केली आहे.
चंदगड ते कोवाड, कामेवाडी, दड्डी, हत्तरगी राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे. पावसाळ्यात थोड्या पावसानेही या मोरीच्या वरून पाणी वाहत असते. त्यामुळे अनेक वेळा बराच वेळ वाहतूक खंडित होते. अशावेळी दोन किलोमीटरवरील कोवाड ला यायचे असेल तर सोळा किलोमीटरचा फेरा मारून सांबरे हडलगे मार्गे यावे लागते.
जाहिरात
जाहिरात
वारंवार पाणी वाहून गेल्यामुळे रस्त्यावर धोकादायक खड्डे पडले आहेत. या ओढ्यावर बांधलेले धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने सध्या थोड्या पावसातही पाणी मोरीवरुन वाहत असते. अशावेळी गेल्या पाच-सहा वर्षात अनेक दुचाकीस्वार वाहून गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत. तथापि सुदैवाने जीवित हानी झाली नाही. सध्या अशा घटना नित्याच्याच झाल्या आहेत. मोरीची उंची वाढवा या मागणीसाठी गेल्या चार-पाच वर्षात ग्रामस्थांनी दोन-तीन वेळा रास्तारोको ही केला होता. तथापि आश्वासनापलीकडे अध्याप कोणतीही हालचाल दिसत नाही. मागणीची तात्काळ दखल न घेतल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

No comments:
Post a Comment