चंदगड ग्रामीण रुग्णांलयात सुविधा मिळाव्यात - आरोग्य मंत्र्यांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

21 August 2020

चंदगड ग्रामीण रुग्णांलयात सुविधा मिळाव्यात - आरोग्य मंत्र्यांना निवेदन

चंदगड ग्रामीण रुग्णांलयात सुविधा मिळाव्यात या मागणीचे निवेदनआरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर पाटील  व खासदार संजय मंडलिक यांना देताना आनंद हळदणकर
चंदगड / प्रतिनिधी
       चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयात अत्यावश्यक सुविधा मिळाव्यात यासाठी नुकताच झालेल्या आरोग्य राज्य मंत्र्यांच्या चंदगड येथील कार्यक्रमा दरम्यान चंदगड नगरपंचायत चे नगरसेवक आनंद ऊर्फ बाळासाहेब हळदनकर यांनी राजेंद्र  यड्रावकर-पाटील यांना निवेदनाद्वारे विनंती केली 
आहे. 

                                                                                             जाहिरात
                                                                                              जाहिरात

       नगरसेवक हळदनकर यांनी निवेदनात चंदगड ग्रामीण रुग्णालयाला एम.डी.डॉक्टर मिळणे आवश्यक आहे,आर्थोपेडिक सर्जन,बालरोगतज्ज्ञ, स्त्री रोग तज्ञ,हार्ट तज्ञ,आयसीओ ची अत्यावश्यकता आहे तरी चंदगड ग्रामीण रुग्णालयात या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा मागणीचे निवेदन आरोग्य राज्य मंत्री यड्रावकर-पाटील यांना दिले आहे.

No comments:

Post a Comment