मागिल वर्षाची अतिवृष्टीची नुकसान भरपाई त्वरित देण्याची शिरोली, अलबादेवी येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची निवेदनाद्वारे मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

21 August 2020

मागिल वर्षाची अतिवृष्टीची नुकसान भरपाई त्वरित देण्याची शिरोली, अलबादेवी येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची निवेदनाद्वारे मागणी

चंदगड / प्रतिनिधी 
         मागील वर्षी अतिवृष्टीने शिरोली सजा अंतर्गत येणाऱ्या शिरोली, अलबादेवी गावामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले होते. त्याची नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नसून ती त्वरीत मिळावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात आज शिरोली, अलबादेवी येथील शेतकऱ्यांनी तहसिलदारांना निवेदन दिले. 

                                                                                              जाहिरात
                                                                                                  जाहिरात

शिरोली सजाअंतर्गत येणाऱ्या शिरोली, अलबादेवी गावामध्ये गेल्या वर्षी (२०१९) अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी जागेवर जात पंचनामे केले होते. परंतु, आजपर्यंत सदरची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नाही. तरी या विलंबाची चौकशी करुन नुकसान भरपाई त्वरीत द्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment