![]() |
प्रा. बसवंत पाटील |
तेऊरवाडी -सी .एल. वत्तसेवा
" भारतीय संसदेने कायदा क्र १०८ /१९७६ ने आदिवासीवरील क्षेत्रिय बंधने हटविल्यानंतर सन १९७१च्या जनगणनेनुसार , १९७६ साली महाराष्ट्र शासनाने आदिवासी विकास योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी आदिवासी क्षेत्र उपयोजना (Tribal Sub Plan ) व आदिवासी बाह्य क्षेत्र उपयोजना (Outside Tribal Sub Plan ) असे दोन भाग करण्यात आले .
आयुक्त ,आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था ,पुणे यांच्या २६ एप्रिल , २०१३ च्या पत्रानुसार संपूर्ण कोल्हापूर जिल्हा हा आदिवासी बाह्य उपयोजना क्षेत्रात समाविष्ठ आहे.या जिल्हयात आदिवासी महादेव कोळी जमातीची लोकसंख्या अल्प आहे मात्र , केंद्र व राज्यशासनाच्या आदिवासी संबंधी सामाजिक ,शैक्षणिक , आर्थिक विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांच्या दृष्टीने दुलक्षित करण्यासारखे नाही .
तथापि , कोल्हापूर जिल्ह्यातील आदिवासी कोळी महादेव जमातीच्या विद्यार्थ्यांना पात्र असून सुद्धा महाराष्ट्र्र शासनाच्या सुवर्णजयंती शिष्यवृत्ती योजनेसह कोणत्याच शासकीय योजनांचा लाभ अगर शिष्यवृत्ती मिळत नसल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा आदिवासी कोळी महादेव जमातीचे अध्यक्ष प्रा . बसवंत पाटील यानी दिली .
याकडे जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा भविष्यात याच आदिवासी विद्यार्थ्यांकडून उग्र आंदोलन छेडण्यात येण्याचा इशाराही प्रा . पाटील यानी दिला आहे .
कोल्हापूर ,सांगली ,सातारा या जिल्ह्याकरीता विभागीय प्रकल्प कार्यालय ,घोडेगाव ता .आंबेगाव, जि. पुणे येथे आहे. या कार्यालयाच्या सूचनेनुसार मौजे चिंचणे व कामेवाडी ता. चंदगड येथील आदिवासी विद्यार्थ्यांचे अर्ज वर्ष २०१५ - २०१६ व २०१६ - २०१७ चे शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरले होतेत.त्याची तपासणी होऊन पंचायत समिती व जिल्हा परिषद मार्फत प्रकल्प कार्यालयाला हे अर्ज पाठवायचे असतात. परंतु या अर्जावर कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही .जिल्हापरिषद प्रशासनाच्या गलथानपणामुळे हे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. याची गंभीर दखल जिल्हापरिषदेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घावी व भविष्यात आदिवासी विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे ही रास्त अपेक्षा आदिवासी दिनी करण्यात येत आहे.
फोटो - प्रा . बसवंत पाटील
No comments:
Post a Comment