कोवाडमध्ये पास्क रेस्क्यू फोर्सकडून बचावकार्य, अडकलेल्या 50 जणांना पोचविले सुरक्षित स्थळी - चंदगड लाईव्ह न्युज

08 August 2020

कोवाडमध्ये पास्क रेस्क्यू फोर्सकडून बचावकार्य, अडकलेल्या 50 जणांना पोचविले सुरक्षित स्थळी

कोवाड (ता. चंदगड) येथे पुरात अडकलेल्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी पोचविताना पास्क रेस्क्यू फोर्सचे जवान.
कोवाड / सी एल वृत्तसेवा
          गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे आणि धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे चंदगड तालुक्यात सलग दुसऱ्या वर्षी पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून गेले तीन दिवस पाणी वाढत असताना पहायला मिळत आहे.तालुक्यात कर्यात भागातील मोठी बाजारपेठ असलेल्या कोवाड ला मागील वर्षी प्रमाणेच यंदाही पुराच्या पाण्याने वेढले आहे.सद्य स्थितीत गावातील निट्टूर रोड सह संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली आली आहे.नदीपलीकडेही याहून वेगळी परिस्थिती नसल्याचे चित्र दिसत आहे.संभाव्य धोका ओळखून मागील महिन्यातच जिल्हाधिकारी कार्यालय,चंदगड तहसील कार्यालय व पास्क रेस्क्यू फोर्स च्या वतीने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण घेऊन कोवाडसाठी कर्यात भागातील येथील स्थानिक असलेल्या एकूण 20 प्रशिक्षित स्वयंसेवकांची टीम तयार ठेवली होती. 
                दोन दिवसांपासून वाढणारे पाणी लक्षात घेता आणि मागील वर्षीच्या अनुभव पाहता तेथील नागरिकांनी स्वतः हुन घराबाहेर येऊन सुरक्षित स्थळी जायला हवे होते परंतु नदीकाठावरील काही कुटुंबे ही आपाआपली घरे सोडण्यास तयार नव्हती.बुधवारी याठिकाणि प्रांताधिकारी पांगारकर यांनी भेट देऊन त्याबाबत सूचना देखील केल्या होत्या परंतु काही कुटुंबे ही घरीच राहिली.चंदगड भागात होणाऱ्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढली अन या कुटुंबांनी मदतीसाठी हाक दिली असता किणी येथील प्रवीण गणाचारी व त्यांचे सहकारी यांनी नदीपलीकडे 4 तर निट्टूर रोड वरील 6 कुटुंबांना सुरक्षित स्थळी पोचविण्यात यश मिळवले.


फोटो -
Attachments area

No comments:

Post a Comment