वीज बील माफ करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय वीज मंडळाला निवेदन देणार - विजयभाई पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

08 August 2020

वीज बील माफ करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय वीज मंडळाला निवेदन देणार - विजयभाई पाटील

चंदगड / प्रतिनिधी
        कोरोनाच्या काळात काढण्यात आलेली सर्व वीज बीले माफ करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी सोमवारी सर्वपक्षीय वतीने तहसीलदार यांना निवेद देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती चंदगड तालुका शे.का.पक्षाचे प्रा. विजयभाई पाटील यांनी सांगितले.                                         कोरोनाच्या काळात गेले कीत्येक दिवस सर्व जनजीवनावर मोठा आर्थिक परिणाम झाला आहे. उलाढाल ठप्प झीली आहे. अशातच महावितरण कडून घरगुती व क्रुषी ,व्यवसाय बीले भरमसाठ काढण्यात आली आहेत. शासनाने मागील स.न.२००९ ते२०१४ च्या काळात क्रषी संजीवणी योजनेनुसार बीले काढावीत एवढेच नव्हे तर वीज बीलेच माफ करावीत या मागणीसाठी तालुक्यातील सर्वपक्षीय संघटनेंच्या वतीने सोमवार दहा आँगष्ट रोजी तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे.या मागणीच्याआशयाचे निवेदन सर्व गावा-गावात असलेल्या शासकीय  कार्यालयाना (तलाठी, ग्रामसेवक) देण्यात यावी व अन्यायकारक वीज बीले माफ करण्यासाठी आवाज उठवावा असे पाटील यांनी सांगितले. तहसीलदार यांना सोमवारी निवेदन देण्यात येणार आहे असे प्रा. विजयभाई पाटील यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment