![]() |
रुकसाना शेख |
अडकूर - सी .एल. वृत्तसेवा
अडकूर (ता. चंदगड) येथील श्री शिवशक्ती हायस्कूल अडकूरचा १०वी बोर्ड परिक्षेचा निकाल १00 % लागला. ९० % च्या वरील पहिल्या दहा मध्ये १० मुलीनीच आपली गुणवत्ता सिद्ध केली . ९६ % गुण मिळवून रुकसाना हायस्कूलमध्ये प्रथम व केंद्रात दुसऱ्या क्रमाकांने उत्तीर्ण झाली.
प्रतिमा पाटील व प्रतिक्षा पाटील या जुळ्या बहिणीनी ९४ .६० व ९४ .२० मिळवून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला .विशेष प्राविण्य मिळवलेले ९० % पेक्षा विधार्थी १० आहेत .८० ते९० % च्या पुठे २४ विद्यार्थी तर प्रथम श्रेणीत ३७ विद्यार्थी तर द्वितिय श्रेणीत ७ विद्यार्थी आहेत. या अगोदर या हायस्कूलने नवोदय विद्यालय , एनएमएमस परिक्षामध्ये उज्वल यश संपादन केले आहे. अडकूर परिसरातील हजारो विद्यार्थी घडवण्यामध्ये या शाळेचा सिंहाचा वाटा आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले जात आहे.
No comments:
Post a Comment