![]() |
एम. व्ही. कानुरकर |
चंदगड - सी. एल. वृत्तसेवा
गेले काही दिवस कोविड लॉक डाऊन काळात विद्यार्थी हित विचारात घेऊन `मराठी अभ्यासक्रम व व्याकरण` या विषयावर जवळजवळ संपूर्ण महिनाभर दररोज एक विडिओ या प्रमाणे ३० व्हिडिओची निर्मिती करून विद्यार्थ्यापर्यंत पोहचविण्याचे काम दि न्यू इंग्लिश स्कूलचे सहाय्यक शिक्षक एम.व्ही.कानूरकर यांनी केले आहे. हे सर्व व्हिडीओ अवघ्या महाराष्ट्राभरातील सर्व परीक्षांसाठी खूपच उपयोगी ठरले आहेत. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. याची दखल "कोल्हापूर येथील 'गरुडभरारी एज्युकेशन अॅड सोशल फाऊंडेशसारख्या संस्थेने घेतली आणि ' कोविड एज्युकेशन योद्धा पुरस्कारासाठी एम.व्ही.कानूरकर यांची निवड केली. या कार्याबददल चंदगड तालूका माध्यमिक शिक्षकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
फोटो - कोविड योद्धा एम .व्ही. कानूरकर
No comments:
Post a Comment