मोबाईल सेवा योग्य नाही म्हणून मनसे आक्रमक - चंदगड लाईव्ह न्युज

08 August 2020

मोबाईल सेवा योग्य नाही म्हणून मनसे आक्रमक

मोबाईल मनोऱ्याचे संग्रहित छायाचित्र
चंदगड / प्रतिनिधी
            चंदगड तालुक्यातील सर्वच मोबाईल सेवा बिनकामी ठरत आहेत,  नेटवर्क व्यवस्थित नसल्याचे संपर्क होत नाही, सतत रेंज जाणे, अस्पष्ट आवाज, इंटरनेट ची गती कमी, इत्यादी कारणाने तालुक्यातील सर्व मोबाईल धारक कंटाळून गेले आहेत. येत्या दोन दिवसात  मोबाईल सेवा सुरळीतपणे नाही चालली तर नाइलाजाने बी.एस. एन. एल. वगळता सर्व टॉवरचा विद्युत पुरवठा बंद पाडून टावर बंद करण्यात येईल असा ईषारा मनसे उपजिल्हाध्यक्ष  प्रताप पाटील यांनी दिला.चंदगड तालुक्यातील आयडिया, जीओ,एअरटेल इत्यादी मोबाईल सेवा गेले कित्येक  दिवस व्यवस्थित  नाही. सद्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे सर्व कामकाज ठप्प आहेत. त्यामुळे शाळा, विद्यालयातुन आँनलाईन शिक्षण पद्धती चा वापर करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, शिक्षण मिळणार आहे. तर कार्यालयीन कामकाज घरी करण्यात येत आहेत. या सर्व कामासाठी चांगल्या दर्जाची मोबाईल सेवा असणे आवश्यक आहे. मात्र गेले कित्येक महिने तालुक्यातील वेगवेगळ्या  मोबाईल कंपन्यांची  रेंजच व्यवस्थित नसल्याने तालुकावासीयांना खुप त्रास होत आहे. याबाबत आयडिया, जीओ,एअरटेल इत्यादी मोबाईल कंपण्याच्या अधिकारी व सर्व लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत याबाबत चर्चा घडवुन आणुन मोबाईल कंपण्यांकडून चांगल्याप्रकारे सेवा मिळावी यासाठी तहसीलदार यांनी संबंधित कंपन्यांच्या अधिका-याना  सहभागी करून हा प्रश्न सोडवावा तसे न झाल्यास मनसे च्या वतीने तालुक्यातील बीएसएनएल वगळता इतर  सर्व  मोबाईल कंपण्यांचे टावर बंद पाडले जातील आणि मग बीएसएनएलकडे ग्राहक वळतील असा निवेदनातून इशारा दिला आहे.या निवेदनावर प्रताप उर्फ पीनु पाटील,(जिल्हा उपाध्यक्ष),राज सुभेदार(तालुका प्रमुख),ज्ञानेश्वर धुरी(तालुका उपाध्यक्ष),योगेश बल्लाळ(ता.प्रसार माध्यम प्रमुख),परशराम मळवीकर(तालुका सहकार.सेना प्रमुख)सचिन गुरव(तालुका वाहतूक सेना प्रमुख)याची नावे आहेत.

No comments:

Post a Comment