सीता कांबळे यल्लापा कांबळे |
संदिप तारिहाळकर : सी. एल. वृत्तसेवा, कागणी
पत्नी निधन झाल्याचा धक्का सहन न झाल्याने केवळ सात दिवसातच पतीचे निधन झाल्याची घटना सोमवार दिनांक 21 रोजी रात्री अकरा वाजता सुंडी (ता. चंदगड) येथे घडली.
सुंडी येथील प्रतिष्ठित नागरिक सीता यल्लाप्पा कांबळे (वय 75) यांचे अल्पशा आजाराने मंगळवार दिनांक १५ रोजी निधन झाले. हा धक्का सहन न झाल्याने त्यांचे पती यल्लापा देमाणा कांबळे (वय ९०) यांचेही सोमवार दिनांक 21 रोजी रात्री अकरा वाजता निधन झाले. या घटनेने कांबळे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. निढोरी (ता. कागल) येथील विद्यामंदिरचे मुख्याध्यापक व सुंडी येथील जय जवान पतसंस्थेचे संचालक जी. वाय. कांबळे, भारतीय सैन्य दलाचे निवृत्त ऑननरी लेफ्टनंट तुकाराम कांबळे यांचे ते वडील होते.
No comments:
Post a Comment