वडिलांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने मुलाचेही निधन, वाचा कोठे? - चंदगड लाईव्ह न्युज

22 September 2020

वडिलांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने मुलाचेही निधन, वाचा कोठे?

कानुर खुर्दच्या गावडे कुटुंबियांवर शोककळा

रामचंद्र गावडे                                   डी. व्ही. गावडे

संदिप तारिहाळकर -कागणी : सी. एल. वृत्तसेवा

       वडिलांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने २४ तासाच्या आत मुलाचेही निधन झाल्याची घटना विजयनगर (बेळगाव) येथे घडल्याने कानूर खुर्द (ता. चंदगड) परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

       मूळचे कानूर खुर्द व सध्या विजयनगर येथील रहिवासी, तुर्केवाडी कुमार विद्यामंदिरचे माजी मुख्याध्यापक विठ्ठल रामचंद्र गावडे (वय ९८) यांचे सोमवारी संध्याकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. यांनतर आपले वडील निधन झाल्याचा धक्का सहन न झाल्याने त्यांचे चिरंजीव व निवृत्त माध्यमिक मुख्याध्यापक डी. व्ही. गावडे (वय ७१) यांचेही मंगळवारी (ता. २२) दुपारी विजयनगर येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते कसबा सांगाव (ता. कागल) येथील डी. एम. हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक होते. विठ्ठल गावडे गुरुजी हे दिवंगत आमदार व्ही. के. चव्हाण पाटील व नरसिंगराव पाटील यांचे ते निकटचे सहकारी होते. बेळगाव येथील सकाळ वृत्तपत्राचे उपसंपादक सुनील गावडे यांचे डी. व्ही. गावडे हे वडील होत. या पिता-पुत्र शिक्षकानी शिक्षण क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटविला असून त्यांचे अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत. रक्षाविसर्जन गुरुवारी दि. 24 रोजी हिंडलगा स्मशानभूमी येथे सकाळी आठ वाजता होणार आहे.



No comments:

Post a Comment