चंदगड तालुका संघाच्या सर्व कर्मचाऱ्यांना कोविड-१९ या काळासाठी कोरोना विमा संरक्षण कवच लागू -आमदार राजेश पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

22 September 2020

चंदगड तालुका संघाच्या सर्व कर्मचाऱ्यांना कोविड-१९ या काळासाठी कोरोना विमा संरक्षण कवच लागू -आमदार राजेश पाटील


संघाचे अध्यक्ष तथा आमदार राजेश पाटील
सी. एल. वृत्तसेवा, चंदगड

       चंदगड तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रभाव पहाता चंदगड तालुक्यातील सर्वच नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.कोरोनाच्या काळात संघाचे सर्व कर्मचारी संस्थेच्यया कामासाठी अहोरात्र झटत आहेत व अशी सेवा करत असतांना संघाकडील एखादा कर्मचारी कोरोनाने अपवादात्मक दगावलेस त्यांचे कुंटीबीय मागे सुरक्षित राहावे याची दख्खल घेऊन , संघाकडील सर्व कर्मचाऱ्यांचेसाठी संघामार्फत कोरोणा कवच वीमा संरक्षण पॉलीशी लागू करणेते आलेली आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष तथा आमदार राजेश पाटील यांनी दिली.

          मार्च 2020 पासून चंदगड तालुका संघाच्या  सर्व कर्मचाऱ्यांनी संघाच्या सर्व शाखा अत्यावश्यक सेवा या नियमाखाली शाखा सुरु ठेवून , तालुक्यांतील सभासद , ग्राहक व हितचिंतक यांना व तालुक्यांतील ग्रामीण भागात खते , धान्यमाल , बि बियाणे औषधे , रेशन इ.मालाची सेवा पुरविली आहे त्याबध्दल संस्थेचे संचालक मंडळ व चेअरमन आम.राजेश नरसिंगराव पाटील  यांनी ,  व सदर पॉलीशी ही भारतीय जीवन बीमा निगम डिव्हीजनल ऑफीस सातारा या कंपणीकडे प्रत्येक कर्मचारी वीमा कवच रुपये ५.०० लाख या प्रमाणे संघामार्फत उतरविलेला आहे व त्याचे प्रिमीयम ची रक्कम एल.आय.सी कंपणीकडे सूपूर्त करणेत आलेली आहे . तसेच सन २०१ ९ -२० या आर्थिक वर्षात संस्थेची रुपये ६८ कोटी पर्यंत विक्रमी उलाढाल झालेली असुन या कामी संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी महापूरात व कोवीड १ ९ च्या काळातसुध्दा उल्लेखनीय कामगिरी केलेमुळे दोन पगार बोनस व एक पगार बक्षीस देणे बाबत जाहिर करुन त्या रक्कमेची तरतूद केलेली आहे याबध्दल संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांमधून समाधान व्यक्त होत असून उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे . तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून कोव्हीड १ ९ साठी जिल्हा आपत्ती निधीसाठी संघाकडून यापूर्वीच रुपये अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये निधी देणेत आलेला आहे . तसेच कोरोनाचे काळात सुध्दा संघामार्फत सर्व सभासद , ग्राहक , हितचिंतक यांना खते , धान्ये , तेले , किटेनाशके , बियाणे , रेशनमाल याचा व्यवस्थीतरित्या वेळेत पुरवठा करणेत येत असलेमुळे सर्व सभासद व ग्राहक यांचेकडून समाधान व्यक्त होत आहे.





No comments:

Post a Comment