कानूर खुर्द येथून विवाहिता बेपत्ता - चंदगड लाईव्ह न्युज

22 September 2020

कानूर खुर्द येथून विवाहिता बेपत्ता

सौ. वैदही विनोद कांबळे

सी. एल. वृत्तसेवा, चंदगड

           कानूर खुर्द (ता. चंदगड) येथून सौ. वैदही विनोद कांबळे (वय-२६) हि विवाहिता बेपत्ता झाल्याची माहिती विनोद कांबळे यांनी चंदगड पोलिसात दिली आहे. १२ सप्टेंबर रात्री दहा ते १३ सप्टेंबर २०२०२ सकाळी सात या दरम्यान मुदतीत रहाते घरी हि घटना घडली. 

         यासंदर्भात पोलिसांतून मिळालेली माहिती अशी – सौ. वैदही कांबळे या घरातून कोणालाही काहीही न सांगता १२ सप्टेंबर रात्री दहा ते १३ सप्टेंबर २०२० दरम्यानच्या कालावधीत रहात्या घरातून निघून गेल्या आहेत. त्या अद्याप परत न आल्याने तिचे नातेवाईक, पै-पाहुणे यांच्याकडे चौकशी करून शोधाशोध केली असता त्या मिळून आल्याने त्या बेपत्ता असल्याची फिर्याद चंदगड पोलिसात दिली आहे. चंदगड पोलिसात आज मिसिंग दाखल असून पोलीस नाईक श्री. शिंदे तपास करीत आहेत.

             त्यांचे वर्णन पुढीलप्रमाणे - रंगाने गव्हाळ, अंगाने सडपातळ, नाक-सरळ लांब, चेहरा उभट, कपाळ सपाट, उंची ५ फूट, केस काळे लांब, अंगात काळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस, त्यावर पांढरा रंगाचे ठिपके, पायात काळ्या रंगाची लेगीज पॅँन्ट, अंगात ग्रे कलरचे स्वेटर, पायात पैंजण, पायात पांढऱ्या रंगाची चप्पल असून मराठी बोलते. वरील वर्णनाची महिला आढळल्यास चंदगड पोलिस ठाण्याशी संपर्क करावा.

No comments:

Post a Comment