कुदनुरचे निवृत्त कृषी अधिकारी देवेंद्र बंबर्गेकर यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

22 September 2020

कुदनुरचे निवृत्त कृषी अधिकारी देवेंद्र बंबर्गेकर यांचे निधन

देवेंद्र बंबर्गेकर

कागणी :  सी. एल. वृत्तसेवा
      मुळचे कुदनूर (ता. चंदगड) व सध्या कोल्हापूर, सरनोबतवाडी येथील रहिवासी, निवृत्त कृषी अधिकारी देवेंद्र रामचंद्र बंबर्गेकर (वय 64) यांचे   रविवार दि. २० रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, चार भाऊ, पत्नी, मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. आयटी इंजिनियर प्राजक्ता बंबर्गेकर यांचे ते वडील तर नौदलाचे निवृत्त लेफ्टनंट मारुती बंबर्गेकर, खाजगी कंपनीचे  वरिष्ठ व्यवस्थापक परशुराम बंबर्गेकर, नॅशनल हेव्ही इंजिनीअरिंगचे मिल असेम्ब्ली फिटर बाळकृष्ण बंबर्गेकर, प्रगतशील शेतकरी विष्णू बंबर्गेकर यांचे ते भाऊ होते. महाराष्ट्र कृषि उद्योग विकास मंडळाच्या यांत्रिकी विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम पाहिले होते. चंदगड, आजरा, गडहिंग्लजसह कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात त्यांनी उल्लेखनीय काम केले होते.


 

No comments:

Post a Comment