![]() |
कोल्हापूर येथे आढावा बैठकित उपस्थित खासदार संजय मंडलिक , आमदार राजेश पाटील , आम . प्रकाश आंबिटकर , मुख्य वनसंरक्षक बेन आदी. |
तेऊरवाडी -सी .एल. वृत्तसेवा
वन्य प्राण्यांचा अधिवास हा मानव वसाहतीकडे वाढत असून वन्यप्राण्यांच्या हल्यामध्ये जीवीत व पिक हानी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने त्यांच्या बदोबस्त व झालेल्या नुकसानीची भरपाई यासंदर्भात खासदार संजय मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली वन विभागाच्या मुख्य कार्यालयात आज आमदार राजेश पाटील, आम. प्रकाश आंबीटकर यांची वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक झाली.
चंदगड - आजरा_भुदरगड_तालुक्यात नागरी वसाहतीमध्ये हत्ती फिरत असले कारणाने यांच्यावर तातडीने उपाययोजना व्हाव्यात याकरीता आजरा तालुक्यातील हत्ती कर्नाटक पॅटर्न वापरून परत पाठवणे व कर्नाटकातून चंदगड मध्ये येणारे हत्ती यांचा वायर फ्लेमिंग उभे करून प्रतिबंध करणे. मुंबई येथे मा.वनमंत्र्यांसोबत बैठक घेणे व नोव्हेंबरमधील पहिल्या आठवड्यात आढावा बैठक घेणे , हत्ती, गवे व इतर जनावरांमुळे होणारे शेतीचे नुकसान बाजारभावाप्रमाणे देणे असे महत्वाचे निर्णय या बैठकीदरम्यान घेण्यात आले. यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक - महाराष्ट्र राज्य व प्रधान मुख्य वनसंरक्षक - कर्नाटक राज्य यांचेशी समन्वय करणयाची जबाबदारी मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन यांचेवर सोपविण्यात आली.
या बैठकीदरम्यान खालीलप्रमाणे महत्वाचे निर्णय घेण्यातआले .
1) प्रधान मुख्य वनसंरक्षक कर्नाटक व महाराष्ट्र यांचे समन्वयाने कर्नाटकातील पाळीव हत्ती आणून आजऱ्यातील हत्तीला कर्नाटकात पाठवणे.
2) कर्नाटकातून येणाऱ्या हत्ती व टस्करांचा प्रतिबंध करणेसाठी खिंडीतील मार्ग वाघोत्रे - गुडवळे चंदगड येथे वायर फ्लेमिंग करणे.
3) तामिळनाडू राज्याने हत्तींच्यासंदर्भात राबवलेल्या उपाययोजनांचा अभ्यास करुन अशाच पध्दतीच्या योजना कोल्हापूर जिल्ह्यात राबवाव्यात
4) शेतीमालाचे होणारे नुकसान बाजारभावाप्रमाणे देण्यासाठी केंद्र व महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करणे.
5) मुंबई येथे माननीय वनमंत्र्यांसोबत बैठक येत्या सात दिवसात व नोव्हेंबर 2020 च्या पहिल्या आठवड्यात आढावा बैठक घेणे.
यावेळी राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर, मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन, प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार संपत खिलारी, विजय देवणे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment