कुदनुर येथील लक्ष्मी नागरी पतसंस्थेच्या सुवर्ण महोत्सव निमित्त प्राथमिक स्वरूपात दहा सभासदांना चांदीचे नाणे भेट देण्यात आले यावेळी मान्यवरांसोबत सभासद
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
सहकार चळवळ नामशेष झाली तर सावकारी पुन्हा फोफावेल. यामुळे गरिबांचे जगणे पुन्हा मुश्किल होईल. म्हणून सहकार चळवळीतील पतसंस्था टिकल्या पाहिजे. यासाठी प्रत्येक कर्जदाराने आपण घेतलेले कर्ज वेळेत नियमानुसार परतफेड केले पाहिजे. असे प्रतिपादन तात्यासाहेब मोहिते प्रशिक्षण केंद्र कोल्हापूरचे उपप्राचार्य प्रा. एस. टी. जाधव यांनी केले. ते कुदनूर, ता. चंदगड येथील श्री लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या ५० वर्षे पूर्ती निमित्त आयोजित सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे माझे चेअरमन एल. एस. कोले होते.
![]() |
लक्ष्मी पतसंस्था सुवर्ण महोत्सव निमित्त कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना प्राध्यापक एस. टी. जाधव |
कार्यक्रमाचे स्वागत संस्थेचे चेअरमन यशवंत बामणे व दीलीप पवार यांनी केले. प्रास्ताविक मौला जमादार यांनी केले. यावेळी पुढे बोलताना प्रा जाधव म्हणाले ९५३ सभासद संख्या व ९ कोटींच्या वर भांडवल असलेल्या लक्ष्मी पतसंस्थेचे सभासद, संचालक, पदाधिकारी व कर्मचारी या चारही घटकांचा समन्वय चांगला असल्यामुळेच संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. संस्थेतील कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी देणारी ही एकमेव पतसंस्था असेल या संस्थेचा आदर्श इतर संस्थाने घेऊन आयुष्यभर संस्थेत राबणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी स्वरूपात काहीतरी रक्कम दिली पाहिजे त्यांनी अजून सांगितले. या पुढील काळातही संस्थेची बदनामी होईल असे वर्तन कोणीही करू नये. वैयक्तिक व राजकीय हेवेदावे तडजोडीने मिटवल्यास संस्थेची प्रगती कोणीही रोखू शकणार नाही. असे विचार त्यांनी व्यक्त केले. यावेळी गोकुळचे माजी संचालक दीपक भरमूआण्णा पाटील, वाय बी पाटील, प्रमाणित लेखापरीक्ष ए. बी. देवेकर, जिल्हा सहकार विकास अधिकारी एस, एस. देसाई, चंदगड तालुका पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष शांताराम भिंगुडे आदी मान्यवरांनी मनोगतातून संस्थेच्या प्रगतीस शुभेच्छा दिल्या.
रविवार दि. ४ मे २०२५ रोजी दुपारी १२ वाजता मेन रोड कुदनुर येथील संस्थेच्या इमारतीत पार पडलेल्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमानिमित्त संस्थेच्या सर्व सभासदांना श्री लक्ष्मी देवीची मुद्रा असलेले चांदीचे नाणे भेट दिले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री घाटगे व प्रकाश पाटील (एस आर ओ कोल्हापूर) यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. आर. गुंडकल व शंकर कोरी यांनी केले चंद्रकांत निर्मळकर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी राजीव गांधी पतसंस्थेचे चेअरमन पी. बी. पाटील कोवाड मर्चंट पतसंस्थेचे संचालक बी. के. पाटील, बी. एस. मुतकेकर, संचालक न्हनूसो जमादार, सिद्धाप्पा आंबेवडकर, शिवाजी हेब्बाळकर, राजू कुंभार, शशिकांत सुतार, भगवान कांबळे, गंगाराम वडर, अश्विनी आंबेवडकर, शितल नागरदळेकर आदी मान्यवरांसह सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक यांनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे व्यवस्थापक बाळकृष्ण नागरदळेकर, तुकाराम मल्हारी, शिवाजी मुतकेकर, सचिन बामणे, दौलत जाधव आदींनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment