धुमडेवाडी येथे विद्युत वाहिनींचा स्पर्श झाल्याने तीन जनावराचा मृत्यू, दोन लाखांचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

19 October 2020

धुमडेवाडी येथे विद्युत वाहिनींचा स्पर्श झाल्याने तीन जनावराचा मृत्यू, दोन लाखांचे नुकसान

चंदगड / प्रतिनिधी 

      धुमडेवाडी (ता. चंदगड) येथे बागीलगे हद्दीत ताम्रपर्णी नदीकाठावरील शेतात वीज वितरण कंपनीचा विद्युत खांब कोसळून वाहिन्याना स्पर्श झाल्याने दोन म्हैशी व एका गायींचा जागीच मृत्यू झाला. 

         गावाजवळून वाहणाऱ्या ताम्रपर्णी नदीकाठावरील शेतात माजी पोलिस पाटील सूभाष रामचंद्र पाटील यांची म्हैस व राजीव जक्काप्पा पाटील यांची एक म्हैस व एक गाय  चरत होत्या. याचवेळी कलंडलेल्या स्थितीत असलेला विद्युत खांब जमिनीवर समांतर पडला. यावेळी विद्युत वाहिनींचा स्पर्श गाय व म्हैशीना झाल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला. त्यामुळे दोन लाख रुपयांचे या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी विज वितरण कंपनीचे अभियंता श्री. लोदी, पशूवैद्यकिय अधिकारी, पोलिस पाटील मोहन पाटील, माजी सभापती शांताराम पाटील  यांनी पंचनामा केला. बाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.



No comments:

Post a Comment