![]() |
पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील निवेदन देताना बाळासाहेब हळदणकर,जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस विद्याधर गुरबे, सभापती चंदगड नगरपंचायत अभिजित गुरबे, नगरसेवकअशोक दाणी, प्रसाद वाडकर उपस्थित होते. |
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड येथील नगरपंचायतीचे कामकाज ज्या इमारतीत मधून चालवले जाते ती इमारत लहान आहे. या ठिकाणाहून कामकाज चालवण्यासाठी इमारत अपुरी पडत आहे. त्यामुळे नगरपंचायतीची इमारत नवीन बांधण्याचा नगरपंचायतीने ठरवले आहे. मात्र यासाठी अंदाजे दहा कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तरी चंदगड नगरपंचायतीसाठी नविन इमारत बांधण्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी द्यावी, अशी मागणी नगरसेवक आनंदा उर्फ बाळासाहेब हळदणकर यांनी पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस विद्याधर गुरबे, सभापती चंदगड नगरपंचायत अभिजित गुरबे, नगरसेवकअशोक दाणी, प्रसाद वाडकर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment