रामनगर रस्ता कॉंक्रिटीकरण शुभारंभ करताना जिप सदस्य कल्लाप्पाण्णा भोगण व मान्यवर. |
कोवाड : सी एल वृत्तसेवा
कोवाड (ता. चंदगड) येथे दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत रामनगर रस्ता कॉंक्रिटीकरण शुभारंभ जिप सदस्य कल्लापाण्णा भोगण यांच्या हस्ते नुकताच पार पडला. भोगण यांच्या प्रयत्नातून या कामासाठी चार लाखाचा निधी उपलब्ध झाला आहे. गेले बरेच दिवस सुधारणेच्या प्रतीक्षेत असलेल्या रामनगर रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू झाल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. भोगण यांना या कामी जि प सदस्या विद्या पाटील, सामाजिक कार्यकर्ते विलास पाटील यांचे सहकार्य लाभले. कॉंक्रिटीकरण शुभारंभ प्रसंगी पाटील दांपत्यासह पी एस भोगण, विनायक राजगोळकर, नारायण कनुकले, पांडुरंग जाधव, बाळू व्हन्याळकर, सागर जाधव, गोविंद आडाव, प्रकाश पाटील, आनंद पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment